Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राहुल गांधींच्या संवादाचा मार्ग मोकळा; अटी-शर्तींसह पुणे पोलिसांकडून कार्यक्रमाला अधिकृत मंजुरी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 19 August 2026, 15:50

पुणे: पुण्यात २२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रो की गुंज’ कार्यक्रमाला अखेर पुणे पोलिसांनी परवानगी दिली आहे. काही अटी आणि शर्तींच्या आधारे ही परवानगी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कार्यक्रमाच्या परवानगीवरून सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.

या कार्यक्रमासाठी पोलिसांनी अद्याप परवानगी दिलेली नसतानाही कार्यक्रम कोणत्याही परिस्थितीत होणारच, अशी भूमिका काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी घेतली होती. बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे पोलिसांकडून कार्यक्रमाला परवानगी मिळणार की शेवटच्या क्षणी नकार दिला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

‘छात्रो की गुंज’ या कार्यक्रमात राहुल गांधी विशेषतः विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाला सुमारे ८ ते १० हजार मुली उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पुणे हे मुलींसाठी पहिली शाळा सुरू झालेल्या ऐतिहासिक शहरांपैकी एक असल्याने या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याच्या विविध भागांतून विद्यार्थिनी या कार्यक्रमासाठी नोंदणी करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

पेपरफुटी, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि हक्क, मुली व महिलांवरील वाढते अत्याचार अशा विविध विषयांवर राहुल गांधी विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत. कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे उपस्थित मुलींना राहुल गांधी यांना थेट प्रश्न विचारण्याची संधी मिळणार आहे. कार्यक्रमस्थळी मुलांसाठीही जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे; मात्र थेट संवादाची संधी प्रामुख्याने मुलींना देण्यात येणार आहे.

 

दरम्यान, कार्यक्रमाच्या परवानगीवरून काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. विरोधकांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करत ‘छात्रो की गुंज’ कार्यक्रमातही अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी म्हटले होते.

पुणे पोलिसांच्या कारवाईवरही जगताप यांनी प्रश्न उपस्थित केले होते. अस्तित्वात नसलेल्या किंवा अंमलात न आलेल्या कलमांखाली गुन्हे दाखल करून नंतर न्यायालयाच्या आदेशानंतर ते मागे घेण्याची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला. आता राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी मिळाल्याने कार्यक्रमाचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

डीजे, लेझर अन् वर्गणीवर राजगड पोलिसांचा कडक इशारा! नियमभंग केल्यास गुन्हा दाखल

Thursday, 10 September 2026, 9:47

पुणेकरांसाठी मोठी अपडेट! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार, प्रतीक्षेचा वेळ होणार कमी

Thursday, 10 September 2026, 9:40

कांदा-लसूण-बटाटा डब्यात देऊ नका! शाळेचा एक मेसेज अन् वादाला तोंड फुटलं; नेमकं प्रकरण काय? वाचा

Thursday, 10 September 2026, 9:36

तिच्यासोबत अफेअर होतं तर माझ्याशी लग्न का केलं? पुण्यात पतीच्या कथित प्रेमसंबंधामुळे नवविवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

Thursday, 10 September 2026, 9:21

माण-हिंजवडी मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण! आता फक्त उद्घाटनाची तारीख बाकी, महत्त्वाची अपडेट आली समोर

Thursday, 10 September 2026, 9:04

सत्ता आपली, पण अधिकारी ऐकत नाहीत, कसा करणार विकास! मोहळांसमोर पुण्यातील नगरसेवकांनी व्यक्त केला संताप

Thursday, 10 September 2026, 8:51
Next Post

आई ओरडत राहिली पण त्याला दया आली नाही! तरुणाने जन्मदात्रीलाच चाकू भोसकून संपवलं; किरकोळ वाद अन् सगळंच उध्वस्त...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp