पुणे : पुण्यातून अत्यंत विकृत आणि संतापजनक घटना समोर आली आहे. अनेकदा मानसिक विकृतीच्या घटना समोर येतात परंतु पश्चिमी पुण्यातुन अत्यंत किळसवाणा आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. कामगार म्हणून काम करणाऱ्या एका विकृताने गायीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. गोठा मालकाने त्याच्याविरुद्ध फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेबाबत अधिकची माहिती अशी की, हा विकृत प्रकार प्रत्यक्ष गोठा मालकानेच पाहिला आहे. विकास अवध शर्मा (वय ३२) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध फिर्याद देणात आली आहे. आरोपीला पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास शर्मा हा मोलमजुरी करणारा कामगार आहे. तो वास्तव्यास असलेल्या परिसरात अनेक प्रकारची कामे करतो. अनेकदा तो फिर्यादी दिलेल्या व्यक्तीच्या मालकीचा गोठा आहे. या गोठ्यात गायी आहेत. आरोपी शर्मा अनेकदा अधून मधून या गोठ्याच्या आजूबाजूला दिसायचा. तसेच, अनेक वेळा तो गोठ्यात सुद्धा जाताना त्याला गोठा मालकाने पाहिले होते. या विकृत प्रकारा बाबत पूर्वीही मालकाला संशय आला होता.
घटनेची तपशीलवार माहिती अशी की, सोमवारी (दि. १३ जानेवारी) रोजी रात्री गोठा मालक गोठ्याचे दार बंद करण्याकरिता गेला होता. त्यावेळी आरोपी शर्मा एका गाईच्या पाठीमागे उभा असलेला त्यांना दिसला. त्यावेळी आरोपी गाईसोबत करत असलेलं कृत्य पाहून मालकाला धक्काच बसला. आरोपी गाई सोबत लैंगिक संबंध प्रस्थापित करीत असताना आढळून आला.
या वेळी मालकाने कुटुंबीयांना आवाज देऊन बोलावून घेतले. आणि आरोपीला पकडून पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली आहे. मालकाने दिलेल्या फिर्यादीत या विकृत प्रकारामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत असं सांगून फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.