Saturday, April 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एमआयटी-एडीटी विद्यापीठाला ‘डास्का’ मानांकन; एआय व डेटा सायन्स अभ्यासक्रमांसाठी मिळाला आंतरराष्ट्रीय दर्जा, ठरले महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 31 March 2026, 18:18

पुणे, ता. 31 : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाला (एमआयटी-एडीटी) डेटा सायन्स कौन्सिल ऑफ अमेरिका यांचे मानांकन प्राप्त झाले असून, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि डेटा सायन्स क्षेत्रातील उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. या मानांकनासह विविध एआय व डेटा सायन्स अभ्यासक्रमांसाठी ‘डास्का’ मान्यता मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ ठरण्याचा मान ‘एमआयटी-एडीटी’ला मिळाला आहे.

 

हे मानांकन 11 पदवी, 3 पदव्युत्तर तसेच पीएच.डी. स्तरावरील संगणक शास्त्र आणि अभियांत्रिकी / माहिती तंत्रज्ञान या शाखेतील अभ्यासक्रमांना प्रदान करण्यात आले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा अ‍ॅनालिटिक्स, क्लाऊड कॉम्प्युटिंग, सायबर सिक्युरिटी, ब्लॉकचेन आणि इंटेलिजंट सिस्टिम्स या आधुनिक डेटा सायन्स व एआयच्या मूलभूत तंत्रज्ञान क्षेत्रांचा यात समावेश आहे.

‘डास्का’ मानांकन जागतिक दर्जाच्या अभ्यासक्रम रचना, शैक्षणिक गुणवत्ता आणि उद्योगाभिमुखतेशी सुसंगतता सिद्ध करणाऱ्या संस्थांनाच प्रदान केले जाते. हे मानांकन डेटा-आधारित अर्थव्यवस्थेच्या बदलत्या गरजांनुसार विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानासह शिक्षण देणाऱ्या जागतिक स्तरावरील संस्थांना बहाल केले जाते.

या मानांकनामुळे डास्काच्या ‘वर्ल्ड डेटा सायन्स अँड एआय इनिशिएटिव्ह’ (डब्ल्यूडीएसएआय) अंतर्गत जागतिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी विद्यापीठाला मिळणार असून, प्राध्यापक प्रशिक्षण, संशोधन सहकार्य आणि सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापनेस चालना मिळणार आहे.

एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी विद्यापीठाच्या या जागतिक यशाबद्दल आनंद व्यक्त करताना म्हटले की, विज्ञान, तंत्रज्ञान आणि मानवी मूल्यांचा समन्वय साधणारी शिक्षण व्यवस्था उभारण्याचा एमआयटी-एडीटी विद्यापीठाचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. भारतातील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील कौशल्याधिष्ठित शिक्षण पुरविण्याचा आमचा मानस असून, डास्का मानांकनामुळे त्या प्रयत्नांना मोठे बळ मिळाले आहे.

विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी ही कामगिरी शैक्षणिक उत्कृष्टता आणि नवोपक्रमाच्या सातत्यपूर्ण वाटचालीचे प्रतीक असून, मिळालेले हे मानांकन सन्मानासोबतच जबाबदारी वाढविणारे देखील असल्याचे नमूद केले.

या मानांकनासाठी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., एनईपी, रँकिंग व मानांकन अधिष्ठाता प्रा. डॉ. विरेंद्र शेटे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, डॉ. गणेश पाठक, डॉ. श्रद्धा फणसळकर आणि डॉ. राकेश सिद्धेश्वर यांचे विद्यापीठ व्यवस्थापनाकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Mit News : एमआयटी एडीटी विद्यापीठात राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा उत्साहात

Saturday, 25 April 2026, 17:12
Pune Crime: How did the Pune Police's 'MCOCA' weapon backfire on them? Did they commit a crime or did they use MCOCA...

Pune MCOCA : पुण्यासह चार जिल्ह्यांत दहशत माजवणाऱ्या ‘अटल्या’ भोसले टोळीवर मोक्का

Saturday, 25 April 2026, 14:01

Pune News : शिरूरमध्ये ‘पोर्टर’ डिलिव्हरी ॲपचा वापर करून ड्रग्ज सप्लाय ; 21 लाखांचा मुद्देमाल जप्त, 3 तस्करांना बेड्या, पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

Saturday, 25 April 2026, 13:50

पुणे ग्रामीण पोलिसांकडून दोन सराईत टोळ्या जेरबंद, तब्बल २३ गुन्ह्यांचा उलगडा तर ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Saturday, 25 April 2026, 13:36

Pune News : वारजे येथे सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी, एक आरोपी जागीच जेरबंद ; पूर्ववैमनस्यातून हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज

Saturday, 25 April 2026, 12:36

Theur News : थेऊर येथे दारूच्या नशेत रिक्षाचालकाने उचलले टोकाचे पाऊल

Saturday, 25 April 2026, 12:33
Next Post
Manoj Jarange in contact with the fraudster Ashok Kharat? Laxman Hakan's attack; said 'Chief Minister, tell me the caste of Kharat'

मनोज जरांगे भोंदू अशोक खरातच्या संपर्कात? लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल; म्हणाले 'मुख्यमंत्री साहेब खरातची जात सांगा'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.