Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे ग्रामीण पोलिसांकडून दोन सराईत टोळ्या जेरबंद, तब्बल २३ गुन्ह्यांचा उलगडा तर ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 25 April 2026, 13:36

लोणी काळभोर, ता. 25 : पुणे ग्रामीण पोलिसांनी गुन्हेगारीविरोधात मोठी मोहीम राबवत जबरी चोरी, चेन स्नॅचिंग, घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांत सक्रिय असलेल्या दोन सराईत टोळ्यांचा पर्दाफाश केला आहे. या धडाकेबाज कारवाईत एकूण २३ गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला असून, सुमारे ४६ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात तब्बल ३२ तोळे सोन्याचे दागिने, मोटारसायकली आणि इतर साहित्याचा समावेश आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर विशेष लक्ष केंद्रित करत तपास सुरू केला. गुन्ह्यांची कार्यपद्धती, वेळ, ठिकाण, तसेच आरोपींच्या हालचालींचे बारकाईने विश्लेषण करण्यात आले. सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहिती आणि साक्षीदारांच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचा माग काढला.

 

पहिली टोळी पोलिसांच्या ताब्यात
मंचर येथील हर्षल दत्तात्रय तांदळे (वय २५) आणि महेश दत्तात्रय मंगळवेढेकर (वय २५) या दोघांना पारगाव हद्दीतील पोंदेवाडी फाटा परिसरातून अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी घरफोडी, चोरी आणि जबरी चोरीचे अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून सुमारे २० तोळे सोन्याचे दागिने, एक पल्सर मोटारसायकल आणि इतर साहित्य असा सुमारे २९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या टोळीमुळे नारायणगाव, पारगाव, जुन्नर, घोडेगाव, आळेफाटा परिसरातील ६ गुन्ह्यांचा उलगडा झाला.
हर्षल तांदळे याच्यावर यापूर्वी ७ गुन्हे दाखल असून त्याच्यावर हद्दपारीची कारवाईही करण्यात आली होती. महेश मंगळवेढेकर याच्यावर दरोडा व चोरीचे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

दुसरी टोळीही पोलिसांच्या जाळ्यात
चेन स्नॅचिंग आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेला पियुष नानावत (वय १९, रा. कामशेत) याला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. चौकशीत त्याने अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून १२ तोळे सोन्याचे दागिने आणि मोटारसायकल असा सुमारे १७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या टोळीमुळे उरुळी कांचन, राजगड, भोर, वडगाव मावळ, खेड, शिरूर, दौंड, लोणावळा ग्रामीण, सासवड, वेल्हा, बारामती, यवत आणि जुन्नर येथील एकूण १७ गुन्ह्यांचा उलगडा झाला. पियुष नानावत हा काही महिन्यांपूर्वीच बाल सुधारगृहातून बाहेर आला असून, त्याच्यावर आधीही चोरी आणि चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघड झाले आहे.

दरम्यान, गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळी भेटी देऊन पुरावे गोळा केले, सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि गोपनीय माहितीदारांच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला. तीन स्वतंत्र तपास पथके तयार करून समांतर तपास राबविण्यात आला, ज्यामुळे कमी वेळेत मोठ्या प्रमाणावर गुन्ह्यांचा उलगडा करण्यात यश आले.

सदरची कामगिरी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस निरीक्षक शंकरराव पाटील, सचिन वांगडे, सुभाष चव्हाण, सचिन कांडगे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, राहुल गावडे, दत्ताजीराव मोहिते, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत,भाऊसाहेब लोकरे, पोलीस अंमलदार दिपक साबळे, संदिप वारे, अक्षय नवले, विक्रमसिंह तापकीर, हेमंत विरोळे, अतुल डेरे, राजु मोमीण, निलेश सुपेकर, तुषार भोईटे, सागर नामदास, अजित भुजबळ, सचिन घाडगे, धिरज जाधव, असिफ शेख, योगेश नागरगोजे, राहुल पवार, समाधान नाईकनवरे, नंदा कदम, सुजाता कदम, सचिन गिलबिले, मंगेश अभंग, संजय साळवे यांच्या पथकाने केली आहे,

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Pune News : तुळापूरमध्ये मध्यरात्री ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा ; 60 ते 70 तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

Sunday, 7 June 2026, 10:40

वाळू माफिया आणि तहसीलदारांचे 6 लाखांत केले साटेलोटे; लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 6 June 2026, 20:47

अवैध मद्यविक्रीचे जाळे उध्वस्त करणार; पुणे-पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम

Saturday, 6 June 2026, 20:11

पुणे-सातारा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार; काही मिनिटांतच गाडी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप

Saturday, 6 June 2026, 19:42

प्रेयसीच्या प्रेमात पत्नीला विसरला पती; दोन मुलांच्या आईचा शारीरिक व मानसिक छळ, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 6 June 2026, 19:29

पुण्यात टपऱ्या आणि हातगाड्यांना रात्री 10 वाजेपर्यंत, तर परवानाधारक दुकाने 24 तास सुरू ठेवण्यास परवानगी; पोलिसांकडून व्यापाऱ्यांना दिलासा

Saturday, 6 June 2026, 19:14
Next Post

Pune News : शिरूरमध्ये 'पोर्टर' डिलिव्हरी ॲपचा वापर करून ड्रग्ज सप्लाय ; 21 लाखांचा मुद्देमाल जप्त, 3 तस्करांना बेड्या, पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.