Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune MCOCA : पुण्यासह चार जिल्ह्यांत दहशत माजवणाऱ्या ‘अटल्या’ भोसले टोळीवर मोक्का

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 25 April 2026, 14:01
Pune Crime: How did the Pune Police's 'MCOCA' weapon backfire on them? Did they commit a crime or did they use MCOCA...

Photo-Social Media

Pune MCOCA पुणे, ता. 25 : पुणेसह अहिल्यानगर, सोलापूर आणि बीड जिल्ह्यांत दरोडे, खुनासह दरोडे, जबरी चोरी आणि घरफोड्यांच्या मालिकेमुळे दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात योगेश ऊर्फ ‘अटल्या’ ईश्वर भोसले आणि त्याच्या टोळीवर अखेर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे दीर्घकाळ पोलिसांसाठी डोकेदुखी ठरलेल्या संघटित गुन्हेगारी टोळीचा कणा मोडला असल्याचे मानले जात आहे. Pune MCOCA

योगेश ऊर्फ अटल्या ईश्वर भोसले (वय 24), सचिन ईश्वर भोसले (वय 25), गहिनीनाथ ईश्वर भोसले (वय 27 सर्व रा. बेलगाव ता. कर्जत जि. अहिल्यानगर), मिलन ईश्वर भोसले (रा. बेलगाव ता. कर्जत जि.अहिल्यानगर), सोन्या ईश्वर भोसले (रा. बेलगाव ता. कर्जत जि. अहिल्यानगर) व युवराज ऊर्फ धोंड्या ईश्वर भोसले (रा. बेलगाव ता. कर्जत जि. अहिल्यानगर) या आरोपींवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. Pune MCOCA

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरीबेल (ता. दौंड) येथील भापकरवस्तीमध्ये भरदिवसा पाच जणांच्या टोळीने दोन मोटारसायकलवर येत एका कुटुंबावर सशस्त्र दरोडा 11 जून 2025 रोजी टाकला होता. धारदार शस्त्रांचा धाक दाखवत “जे आहे ते द्या, नाहीतर संपवून टाकतो,” अशी धमकी देत घरातील सुमारे 3 लाख 52 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लुटण्यात आली होती. या घटनेमुळे परिसरात मोठी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी ज्ञानेश्वर सावंत यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली होती. त्यानुसार दौंड पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. Pune MCOCA

 

घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि दौंड पोलीसांनी संयुक्त तपास सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि गोपनीय माहितीदारांच्या मदतीने तपासाचा वेग वाढविण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शिरापूर (ता. दौंड) येथे सापळा रचून योगेश ऊर्फ ‘अटल्या’ भोसले (वय 24), सचिन भोसले (वय 25) आणि गहिनीनाथ भोसले (वय 27) यांना शिताफीने ताब्यात घेतले. Pune MCOCA

सखोल चौकशीत या आरोपींनी आपल्या सख्ख्या भावांसह – मिलिंद उर्फ मिलींद भोसले, सोन्या भोसले आणि युवराज ऊर्फ धोंड्या भोसले – मिळून हा दरोडा टाकल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी मिलिंद आणि सोन्या भोसले यांना अटक केली असून, युवराज उर्फ धोंड्या हा अद्याप फरार आहे. या प्रकरणी एकूण 7 आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून, अटक आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. Pune MCOCA

तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली की, ही टोळी केवळ एका गुन्ह्यापुरती मर्यादित नसून, पुणे ग्रामीणसह इतर जिल्ह्यांत दिवसाढवळ्या घरफोड्या, जबरी चोरी, दरोडे, खुनाचा प्रयत्न, अवैध शस्त्रांचा वापर अशा गंभीर गुन्ह्यांत सक्रिय होती. एकूण 18 गंभीर गुन्ह्यांमध्ये या टोळीचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्हे करताना अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हालचाली करून टोळीने विविध भागांत दहशत निर्माण केली होती. Pune MCOCA

संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सुनील फुलारी (विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र) यांनी या प्रकरणातील कागदपत्रांची सखोल पडताळणी करून मोक्का कायद्यांतर्गत कारवाईस मंजुरी दिली. त्यानुसार पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या प्रस्तावावरून या टोळीवर मोक्का लागू करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. Pune MCOCA

सदरची कामगिरी पुणे जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक, गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, सहायक पोलीस उपनिरीक्षक महेश बनकर पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम, स्थानिक गुन्हे शाखेचे शिरुर, दौंड, बारामती विभागातील तपास पथक, पोलीस अंमलदार अक्षय कुंभार, पवन माने यांनी प्रस्ताव तयार करण्यास मदतनीस म्हणुन कामगिरी केली आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! जूनचा हप्ता ‘या’ तारखेला; पण हजारो महिलांचे 1500 रुपये होणार बंद

Sunday, 5 July 2026, 10:17

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06
Next Post

Mit News : एमआयटी एडीटी विद्यापीठात राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा उत्साहात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.