Saturday, November 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एमपीएससी गट-क पूर्व परीक्षेसाठी १६,७१७ पदांची महाभरती! उमेदवारांना वयोमर्यादेत १ वर्षाची सूट; १३ नोव्हेंबरपासून अर्जप्रक्रिया सुरु

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 7 November 2026, 16:52

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ अंतर्गत भरती होणाऱ्या पदांच्या संख्येत मोठी वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी जाहीर केलेल्या पदांमध्ये वाढ करून आता एकूण १६ हजार ७१७ जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यासंदर्भात नवीन परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. राज्यातील सरकारी भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी, यासाठी शासनाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीने काही महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर विविध विभागांकडून प्राप्त झालेल्या मागणीपत्रांचा विचार करून पदसंख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आयोगाच्या माहितीनुसार, राज्यातील २५ प्रशासकीय विभागांमध्ये एकूण १६ हजार ७१७ पदे भरली जाणार आहेत. यामध्ये लिपिक-टंकलेखक पदांसाठी सर्वाधिक ३ हजार ९६६ जागा उपलब्ध आहेत. वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागात ३ हजार ९११ पदांची भरती केली जाणार आहे. तसेच महसूल विभागातील ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठी पदांसाठी १ हजार ८४० जागा उपलब्ध झाल्या आहेत.

या भरतीसाठी विविध पदांनुसार सामाजिक आणि समांतर आरक्षणाचा तपशीलही जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे उमेदवारांना आपल्या प्रवर्गानुसार उपलब्ध जागांची माहिती घेता येणार आहे.

भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांना आणखी एक दिलासा मिळाला आहे. शासनाने कमाल वयोमर्यादेत एक वर्षाची सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच वाढीव पदांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची किंवा पदांचे विकल्प सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

यासाठी १३ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन सुविधा उपलब्ध असेल. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी या मुदतीत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी.

असा करा ऑनलाइन अर्ज

१. सर्वप्रथम MPSC च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

२. संकेतस्थळावरील ‘ONLINE FACILITIES’ या विभागात जाऊन ‘Online Application System’ हा पर्याय निवडा.

३. नवीन उमेदवारांनी ‘New User Registration’ या पर्यायावर क्लिक करून नोंदणी करावी. यापूर्वी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी थेट लॉगिन करावे.

४. त्यानंतर ‘Online Application’ या पर्यायामध्ये जाऊन ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६’ ही परीक्षा निवडा.

५. आवश्यक माहिती भरून अर्जाची प्रक्रिया पूर्ण करा.

वाढीव पदांमुळे उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली असून, उमेदवारांनी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरील सूचना आणि वेळापत्रक तपासून अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडली! ‘KBC’चे शूटिंग थांबले, बिग बींच्या प्रकृतीबाबत चाहत्यांमध्ये चिंता

Saturday, 7 November 2026, 20:57

पायल झांबरे प्रकरणात मोबाईल उघडणार गूढ? ‘चौथा आरोपी’ कोण, पतीसह तिघांची कोठडी वाढवली!

Saturday, 7 November 2026, 20:08

डकवर्थ-लुईसचा खेळ अन् किवींचा पराभव! टीम इंडियाने वर्षभरात 11 वेळा न्यूझीलंडला चारली धूळ

Saturday, 7 November 2026, 19:45

पुणे जिल्हा परिषद शाळांमध्ये दिवाळी पाडव्याला भरणार माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

Saturday, 7 November 2026, 19:30

पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत परिसरातील पथदिवे अखेर पुन्हा प्रकाशले!

Saturday, 7 November 2026, 19:13

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार?सप्टेंबरचा हप्ता मिळाला,ऑक्टोबरच्या 1500 हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर..

Saturday, 7 November 2026, 18:42
Next Post

वरवंड येथे सुरु असलेल्या ३० कोटींच्या ग्रामीण रुग्णालयाच्या कामाची आ. राहुल कुल यांच्याकडून पाहणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp