Monday, November 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पायल झांबरे मृत्यू प्रकरणात भावाचा मोठा खुलासा! आदल्या रात्री सासू-सुनेत तुफान वाद अन् पायलला बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 2 November 2026, 21:20

पुणे : मुकुंदनगर येथील पायल अक्षय झांबरे यांच्या आत्महत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. सासरच्या मंडळींकडून मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याने पायलने टोकाचे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप तिच्या भावाने केला आहे. आत्महत्येच्या आदल्या रात्री सासू आणि पतीसोबत तिचा वाद झाला होता. या वादादरम्यान दोघांनीही तिला मारहाण केल्याचा दावा माहेरच्या मंडळींनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आदल्या रात्री सासू आणि सुनेमध्ये जोरदार वाद झाला होता. त्यानंतर पायल घाबरलेल्या अवस्थेत माहेरी आली होती. सासरच्या मंडळींकडून आपल्याला होत असलेल्या त्रासाबाबत तिने भावाला सांगितले होते, अशी माहिती तिच्या भावाने दिली. या घटनेमुळे पायल मानसिक तणावाखाली असल्याचेही माहेरच्या मंडळींचे म्हणणे आहे.

पायलच्या भावाने घटनेच्या सकाळी घडलेल्या घटनांबाबत माहिती दिली. सकाळी पायल बेपत्ता असल्याचा फोन आल्यानंतर तिचे माहेरचे नातेवाईक सात ते साडेसातच्या सुमारास झांबरे यांच्या घरी पोहोचले. त्यावेळी सासरची मंडळी घरात उपस्थित होती. मात्र, नातेवाईक पोहोचताच पायलला गाडीतून स्वारगेट परिसरात शोधण्यासाठी जात असल्याचे सांगून ते निघून गेल्याचा आरोप तिच्या भावाने केला आहे.

पायलचा सहा वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात विवाह झाला होता. लग्नावेळी माहेरच्या मंडळींनी मोठा हुंडा आणि मानपान दिल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले. पायलला चार वर्षांची मुलगी आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून सासरच्या मंडळींकडून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या त्रासाला कंटाळून तिने मुकुंदनगर येथील जुन्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

पायलच्या आत्महत्येची बातमी समोर आल्यानंतर मुकुंदनगर परिसरात संतापाची लाट उसळली. संतप्त नातेवाईक आणि परिचितांनी झांबरे पॅलेसवर दगडफेक करत तोडफोड केली. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून, कौटुंबिक छळ आणि मारहाणीच्या आरोपांच्या अनुषंगाने सासरच्या मंडळींची चौकशी केली जात आहे. आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात दिवाळीआधी पाणी संकट! सलग ३ दिवस अनेक भागांत पाण्याचा थेंब नाही; पर्वती अन् खडकवासला केंद्रात सलग बिघाड

Monday, 2 November 2026, 22:04

दौंडमध्ये SRPF मुख्यालयातून चंदनाच्या झाडाची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 2 November 2026, 21:56

पायल झांबरे मृत्यू प्रकरणात भावाचा मोठा खुलासा! आदल्या रात्री सासू-सुनेत तुफान वाद अन् पायलला बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?

Monday, 2 November 2026, 21:20

दुष्काळाशी लढण्यासाठी हवेली तालुक्याचा कृती आराखडा तयार; हवेलीचा दुष्काळग्रस्त तालुक्यात समावेश करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..

Monday, 2 November 2026, 20:48

दिवाळीत गावी जाणाऱ्या पुणेकरांसाठी एसटी महामंडळाचा मोठा निर्णय! ९०० जादा बस रस्त्यावर उतरणार

Monday, 2 November 2026, 20:29

प्रकृती बिघडल्याने शरद पवार पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल! डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर पवारांचे सर्व नियोजित दौरे रद्द

Monday, 2 November 2026, 19:52
Next Post

दौंडमध्ये SRPF मुख्यालयातून चंदनाच्या झाडाची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp