Tuesday, November 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ठाकरेंच्या नगराध्यक्षांची शिंदेंच्या गोटात एन्ट्री?उदय सामंतांनी दिले पक्षांतराचे संकेत,सस्पेन्स वाढला….

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 24 November 2026, 17:29

पुणे : राज्यातील राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या नगराध्यक्षांच्या बैठकीला उद्धव ठाकरे गटाचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या बैठकीनंतर पारकर यांनी कोणाशीही न बोलता तिथून काढता पाय घेतला, त्यामुळे ते लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी वेग धरला आहे.

या संदर्भात माध्यमांशी बोलताना राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अत्यंत सूचक वक्तव्य केले आहे. संदेश पारकर शिवसेनेच्या बैठकीला उपस्थित राहिले आणि त्यांनी सुरुवातीलाच भाषण केले असेल, तर त्यातून काय तो अर्थ तुम्हीच समजून घ्यावा, असे सामंत यांनी म्हटले आहे. मात्र, सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने ‘ऑपरेशन टायगर’वर अधिक बोलणे टाळत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

एकनाथ शिंदे यांची काम करण्याची पद्धत वेगळी असून ते कधी कोणती राजकीय खेळी करतील, याचा कोणालाही अंदाज येत नाही, असे उदय सामंत यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पूर्वीच्या शिवसेना प्रवेशाची आठवण करून देत, त्यांचे ऑपरेशन कधी पार पडले हे कोणालाही समजले नव्हते, असा टोलाही लगावला.

दुसरीकडे, शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी सुरतहून परतणाऱ्या आमदारांबाबत केलेल्या ‘रामनाम सत्य’ या विधानावरून सुरू असलेल्या वादावरही सामंत यांनी आपली भूमिका मांडली. शिरसाट यांच्या वक्तव्याचा आधार घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलीन करण्याचा आणि त्यांची लोकप्रियता कमी करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात असल्याचा आरोप सामंत यांनी केला आहे. महाराष्ट्रातील जनतेला एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीची पूर्ण कल्पना असून, आमचा पक्ष त्यांच्याच नेतृत्वाखाली पुढे जात असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

एकंदरीत, शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या या सूचक विधानांमुळे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांच्या बैठकीतील उपस्थितीमुळे आगामी काळात राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ठाकरेंच्या नगराध्यक्षांची शिंदेंच्या गोटात एन्ट्री?उदय सामंतांनी दिले पक्षांतराचे संकेत,सस्पेन्स वाढला….

Tuesday, 24 November 2026, 17:29

लोणी काळभोर येथील शेतकऱ्याचा मुलगा गौरव वलठे बनला एमबीबीएस डॉक्टर!

Tuesday, 24 November 2026, 17:04

पेट्रोल टाकून दुकान पेटवले! आगीत लाखोंचा माल खाक; 4 ते 5 लाखांचे नुकसान

Tuesday, 24 November 2026, 16:08

भोरमधील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात ५५ वर्षीय आरोपी दोषी; कारागृहात भोगलेल्या शिक्षेइतकीच शिक्षा

Tuesday, 24 November 2026, 15:58

बारामती भिगवण रस्त्यावरील शिवन्या लॉजमधील कथित देहव्यवसायाचा पोलिसांकडून पर्दाफाश! लॉजमालक, व्यवस्थापकासह तिघांवर गुन्हा दाखल

Tuesday, 24 November 2026, 15:53

बारामतीत 135 आरोपी जेरबंद!पहाटेच्या धडक मोहिमेत 65 वॉरंटधारकांसह 70 फरारी ताब्यात

Tuesday, 24 November 2026, 15:24
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp