Monday, October 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत MPSC बद्दल मोठा निर्णय! MPSC मुख्य परीक्षा २०२५ चे रिचेकिंग होणार; मुलाखतींनाही तात्काळ स्थगिती

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 10 September 2026, 19:07

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेतील पेपरफुटीच्या प्रकरणावरून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत MPSC मुख्य परीक्षा २०२५च्या निकालाचे रिचेकिंग करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच २१ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या २०२५च्या मुलाखतींनाही तत्काळ स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता पुनर्तपासणीनंतर निकाल पुन्हा जाहीर केला जाणार आहे.

पुण्यात MPSCच्या प्रश्नांवरून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्या मुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. बैठकीत मुख्य परीक्षा २०२५च्या निकालाची पुनर्तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही तपासणी दळवी समितीच्या शिफारशींच्या आधारे केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

मुलाखतींमध्ये उमेदवारांना असमान पद्धतीने जास्त गुण मिळू नयेत, यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात येणार आहेत. यासाठी व्ही. राधा यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीसमोर विद्यार्थ्यांना आपले प्रश्न आणि तक्रारी मांडता येणार आहेत. तसेच आरटीआयअंतर्गत मागविलेल्या उत्तरपत्रिका आणि संबंधित कागदपत्रे उपलब्ध करून देण्याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

आंदोलक निखिल पाटील यांनी बैठकीनंतर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्याचे सांगितले. चौकशीनंतर दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या १७ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाबाबतही बैठकीत चर्चा झाली.

 

दरम्यान, मागण्या आठवडाभरात पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असून, मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा उपोषण करण्याचा अधिकार विद्यार्थ्यांना असल्याचेही त्यांनी सांगितल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. त्यामुळे MPSCच्या परीक्षा प्रक्रियेबाबत पुढील काही दिवसांत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

बारामतीत खळबळ! प्रसिद्ध उद्योजक आणि समाजसेवक राणा सूर्यवंशी यांच्यावर जीवघेणा हल्ला; गोळीबार अन् कोयत्याने सपासप वार

Sunday, 18 October 2026, 22:03

अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार! दुचाकीवरून आलेल्या ३ जणांनी झाडल्या ७ गोळ्या; पहा धक्कादायक Video

Sunday, 18 October 2026, 20:38

टाटा ट्रस्ट्सचा ऐतिहासिक निर्णय! देशभरात उभारली जाणार ४० ते ५० नवीन रुग्णालये; गरिबांसाठी मोफत उपचार, ५ वर्षांचा मेगा प्लॅन जाहीर

Sunday, 18 October 2026, 20:18

पुण्यात प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा चौधरीसोबत भयानक प्रकार! जबरदस्ती कारमध्ये कोंबलं; कार्यक्रमाचे पैसे थकवले, म्हणाली “मला किडनॅप…

Sunday, 18 October 2026, 20:15

दौंडमध्ये चोरट्यांचा कारनामा! ‘यहाँ कोई संजय राऊत रहता है क्या?’ घराबाहेर झाडू मारणाऱ्या महिलेला विचारलं अन् क्षणात मंगळसूत्र हिसकावून पसार…

Sunday, 18 October 2026, 20:12

पुणेकरांनो सावधान! तुम्ही पिताय ते दूध खरोखरच शुद्ध आहे का? पुणे विभागात तब्बल ७८ टक्के भेसळयुक्त दूध जप्त

Sunday, 18 October 2026, 19:53
Next Post

दिवाळी-छठपूजेसाठी गावी जाणाऱ्या पुणेकरांची उडाली झोप; रेल्वेगाड्यांमध्ये 'रिग्रेट'चा मेसेज

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp