Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ब्रिटनच्या संसदेत घुमला ‘जय महाराष्ट्र’चा निनाद! हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मान

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 10 September 2026, 22:50

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ब्रिटनच्या संसदेतील वरिष्ठ सभागृह हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यात जगभरातील मान्यवरांच्या उपस्थितीत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात ‘नमस्कार-जय महाराष्ट्र’ अशा मराठी शब्दांनी केली आणि महाराष्ट्राच्या विकासाची वाटचाल उपस्थितांसमोर मांडली.

मुख्यमंत्री आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून राबवलेल्या नागरिककेंद्री, पारदर्शक आणि नाविन्यपूर्ण प्रशासनासाठी शिंदे यांना हा पुरस्कार देण्यात आला. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राबवण्यात आलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आणि नागरिकांना शासकीय सेवा थेट उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केलेला ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम यांचा विशेष उल्लेख पुरस्काराच्या मानपत्रात करण्यात आला आहे.

आपल्या भाषणात शिंदे यांनी आपल्या जडणघडणीमध्ये आई आणि पत्नीच्या कष्टांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करण्याची प्रेरणा त्यातून मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या या वक्तव्याला सभागृहातून जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला.

महाराष्ट्राच्या विकासाची दिशा छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची संकल्पना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक न्यायाचा विचार आणि सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवणारे प्रशासन या तीन मूल्यांवर आधारित असल्याचे शिंदे यांनी सांगितले. हा पुरस्कार केवळ आपला वैयक्तिक सन्मान नसून महाराष्ट्रातील जनतेच्या कष्टांचा, त्यांच्या आकांक्षांचा आणि राज्याच्या विकासाच्या वाटचालीचा गौरव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

यूके एशियन बिझनेस कौन्सिल आणि ‘कॅनव्हास फॉर केअर क्रिएटिव्ह आर्ट कॅम्पस’ यांच्या संयुक्त विद्यमाने हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. उत्तर आयर्लंडच्या माजी फर्स्ट मिनिस्टर ऑनरेबल बॅरोनेस आर्लेन फॉस्टर, यूके एशियन बिझनेस कौन्सिलचे चेअरमन अँड्र्यू ग्रोकॉक, कौन्सिलचे उपाध्यक्ष सुदीप सकाळे यांच्यासह ब्रिटनचे वरिष्ठ मंत्री, संसद सदस्य, महापौर, विविध देशांचे राजदूत, जागतिक उद्योजक आणि कॉमनवेल्थ देशांतील मान्यवर उपस्थित होते.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दुष्काळी यादीत नाव नाही? शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; आता मिळणार दिलासा..

Sunday, 27 September 2026, 21:42

प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यूचं गूढ अखेर उकललं! पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

Sunday, 27 September 2026, 21:03

शरद पवार पुन्हा मैदानात! मुख्यमंत्री फडणवीसांना थेट पत्र; कोणत्या 17 मागण्यांचा उल्लेख?

Sunday, 27 September 2026, 20:44

पुण्यात 12 वर्षीय मुलीवर अत्याचार; 52 वर्षीय कंत्राटी कामगार पोलिसांच्या ताब्यात,सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक अन्…….

Sunday, 27 September 2026, 20:06

खराडीत विनापरवाना डीजेवर पोलिसांचा दणका; चार जणांविरुद्ध गुन्हा तर लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Sunday, 27 September 2026, 19:39

3 दिवस बँकिंग सेवा ठप्प होणार? उद्यापासून कर्मचाऱ्यांचा संप; ATM- UPI बाबत महत्त्वाची अपडेट

Sunday, 27 September 2026, 18:32
Next Post

मुंबईसह राज्यभरात पावसाचा मोठा इशारा! वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटासह ‘या’ जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp