पुणे : मुंबई वेधशाळेने राज्यातील पुढील काही दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून, नागरिकांनी खराब हवामानाच्या काळात आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

११ सप्टेंबर रोजी नाशिक घाट, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

१२ सप्टेंबर रोजी राज्यातील मोठ्या भागात पावसाची शक्यता आहे. धुळे, नाशिक घाट, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि विजांची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

१३ सप्टेंबर रोजी पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, पुणे घाट, पुणे, सातारा घाट, सातारा, रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
१४ सप्टेंबर रोजी नाशिक घाट, पुणे घाट, पुणे, अहिल्यानगर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या काळात विजांचा कडकडाट किंवा वादळी वारे सुरू असताना नागरिकांनी मोकळ्या जागेत जाणे टाळावे आणि सुरक्षित ठिकाणी राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.






