Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तुकाराम मुंढेंचा दणका! गणेशोत्सवात महाप्रसाद वाटप करणाऱ्या मंडळांसाठी FDA ची कठोर नियमावली लागू

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 10 September 2026, 20:27

पुणे : गणेशोत्सवात महाप्रसादाचे आयोजन करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांसाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) विशेष नियमावली जाहीर केली आहे. महाप्रसादातील अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन मंडळांना एक दिवसाचा तात्पुरता अन्न परवाना घेणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

तात्पुरत्या परवान्यासाठी मंडळाच्या आयोजकांना अर्जामध्ये स्वयंपाकी किंवा केटररचे नाव आणि त्याचा FDA परवाना क्रमांक नमूद करावा लागणार आहे. यासोबत मंडळाचे नाव, महाप्रसादाची तारीख आणि वेळ तसेच तयार करण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांची संपूर्ण माहिती द्यावी लागेल. अन्न तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा स्रोत, अन्न सुरक्षा पर्यवेक्षकाचे नाव आणि कच्चा माल पुरवठादारांची माहितीही अर्जात द्यावी लागणार आहे.

महाप्रसाद तयार झाल्यानंतर त्यातील शिजवलेले अन्न ४८ तास सुरक्षित पद्धतीने जतन करून ठेवण्याची व्यवस्था मंडळाकडे असणे आवश्यक आहे. अन्नातून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी ही व्यवस्था महत्त्वाची असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या तात्पुरत्या परवान्यासाठी मंडळांना केवळ १०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. मंडळाच्या अध्यक्षांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधीने अर्ज तयार करून तो [fdasatara22@gmail.com](mailto:fdasatara22@gmail.com) किंवा [ts.shingade@nic.in](mailto:ts.shingade@nic.in) या ई-मेलवर पाठवायचा आहे. त्यानंतर festivals.mahafda.in या संकेतस्थळावर जाऊन ‘Stall Holder’ या श्रेणीतून ऑनलाइन अर्ज भरून १०० रुपयांचे शुल्क जमा करावे लागेल.

 

ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तात्पुरता परवाना ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. त्यामुळे महाप्रसादाचे आयोजन करणाऱ्या गणेश मंडळांनी वेळेत परवाना घेऊन अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

अखेर हवेलीतील ४८ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त! लोणी काळभोर आणि उरुळी कांचनला जयश्री बेनके तर थेऊरला राजेंद्र सात्रस यांची नियुक्ती

Thursday, 10 September 2026, 22:35

४०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी अन् मुंबईपर्यंत माग काढत पुणे पोलिसांनी आवळला इराणी चोरांच्या मुसक्या

Thursday, 10 September 2026, 22:01

मनोज जरांगेंविरोधात थेट ईडीची एन्ट्री! हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आणि वाळू तस्करीचा गंभीर आरोप

Thursday, 10 September 2026, 21:14

तुकाराम मुंढेंचा दणका! गणेशोत्सवात महाप्रसाद वाटप करणाऱ्या मंडळांसाठी FDA ची कठोर नियमावली लागू

Thursday, 10 September 2026, 20:27

दिवाळी-छठपूजेसाठी गावी जाणाऱ्या पुणेकरांची उडाली झोप; रेल्वेगाड्यांमध्ये ‘रिग्रेट’चा मेसेज

Thursday, 10 September 2026, 19:50

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत MPSC बद्दल मोठा निर्णय! MPSC मुख्य परीक्षा २०२५ चे रिचेकिंग होणार; मुलाखतींनाही तात्काळ स्थगिती

Thursday, 10 September 2026, 19:07
Next Post

मनोज जरांगेंविरोधात थेट ईडीची एन्ट्री! हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आणि वाळू तस्करीचा गंभीर आरोप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp