Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दिवाळी-छठपूजेसाठी गावी जाणाऱ्या पुणेकरांची उडाली झोप; रेल्वेगाड्यांमध्ये ‘रिग्रेट’चा मेसेज

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 10 September 2026, 19:50

पुणे : दिवाळी आणि छठपूजेसाठी गावी जाण्याचे नियोजन करणाऱ्या पुणेकरांना यंदा रेल्वे आरक्षणासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. आरक्षण सुरू होताच काही मिनिटांतच अनेक गाड्यांमधील उपलब्ध जागा संपत असून, त्यानंतर तिकीट बुकिंगमध्ये ‘रिग्रेट’ किंवा ‘नो रूम’ असा संदेश दिसत आहे. त्यामुळे विदर्भ, कोकण, मराठवाड्यासह बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि झारखंडकडे जाणाऱ्या प्रवाशांची चिंता वाढली आहे.

नोकरी, शिक्षण आणि व्यवसायाच्या निमित्ताने पुण्यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह उत्तर आणि पूर्व भारतातील नागरिक मोठ्या संख्येने राहतात. दिवाळीनिमित्त कुटुंबासह गावी जाण्यासाठी दानापूर, पाटणा, गोरखपूर, नागपूर, अमरावती तसेच कोकण आणि इतर शहरांकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना मोठी मागणी असते. यंदाही या मार्गांवरील गाड्यांचे आरक्षण खुले होताच काही मिनिटांत जागा उपलब्ध नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

रेल्वेने १ नोव्हेंबर २०२४ पासून आगाऊ आरक्षणाचा कालावधी १२० दिवसांवरून ६० दिवस केला आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळातील आरक्षणावर मोठा ताण येत असल्याचे चित्र आहे. एखाद्या गाडीतील आरक्षित जागा आणि प्रतीक्षा यादीची निर्धारित मर्यादा पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रवाशांना तिकीट मिळत नाही. अशावेळी संबंधित गाडी आणि श्रेणीसमोर ‘रिग्रेट’ किंवा ‘नो रूम’ असा संदेश दिसतो.

आरक्षण न मिळाल्याने प्रवाशांना तत्काळ तिकीट, खासगी बस किंवा विमानप्रवासाचा पर्याय स्वीकारावा लागू शकतो. मात्र सणासुदीच्या काळात खासगी बसचे भाडे वाढण्याची शक्यता असल्याने सर्वसामान्य कुटुंबांच्या खर्चात मोठी वाढ होऊ शकते.

 

या पार्श्वभूमीवर पुणे आणि हडपसरहून दानापूर, गोरखपूर, नागपूर, अमरावती तसेच कोकणासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडाव्यात, अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे. नियमित गाड्यांना अतिरिक्त डबे जोडावेत, विशेष गाड्यांचे वेळापत्रक लवकर जाहीर करावे आणि आरक्षण प्रक्रियेतील गैरप्रकार रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

अखेर हवेलीतील ४८ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त! लोणी काळभोर आणि उरुळी कांचनला जयश्री बेनके तर थेऊरला राजेंद्र सात्रस यांची नियुक्ती

Thursday, 10 September 2026, 22:35

४०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी अन् मुंबईपर्यंत माग काढत पुणे पोलिसांनी आवळला इराणी चोरांच्या मुसक्या

Thursday, 10 September 2026, 22:01

मनोज जरांगेंविरोधात थेट ईडीची एन्ट्री! हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आणि वाळू तस्करीचा गंभीर आरोप

Thursday, 10 September 2026, 21:14

तुकाराम मुंढेंचा दणका! गणेशोत्सवात महाप्रसाद वाटप करणाऱ्या मंडळांसाठी FDA ची कठोर नियमावली लागू

Thursday, 10 September 2026, 20:27

दिवाळी-छठपूजेसाठी गावी जाणाऱ्या पुणेकरांची उडाली झोप; रेल्वेगाड्यांमध्ये ‘रिग्रेट’चा मेसेज

Thursday, 10 September 2026, 19:50

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत MPSC बद्दल मोठा निर्णय! MPSC मुख्य परीक्षा २०२५ चे रिचेकिंग होणार; मुलाखतींनाही तात्काळ स्थगिती

Thursday, 10 September 2026, 19:07
Next Post

तुकाराम मुंढेंचा दणका! गणेशोत्सवात महाप्रसाद वाटप करणाऱ्या मंडळांसाठी FDA ची कठोर नियमावली लागू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp