पुणे : पायल झांबरे आत्महत्या प्रकरणात स्वारगेट पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले आहे. पायलच्या लग्नात झांबरे कुटुंबाला हुंड्यात देण्यात आलेले तब्बल ५० तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. या प्रकरणात पायलचा पती, सासू आणि सासरे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. तर चौथी आरोपी असलेली पायलची नणंद अद्याप फरार असून, पोलीस तिचा शोध घेत आहेत.

पायलचा हुंड्याच्या मागणीवरून सासरच्या मंडळींकडून शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात येत असल्याचा आरोप आहे. याच प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी लग्नात देण्यात आलेले ५० तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
या प्रकरणात पायलचा पती अक्षय झांबरे, सासरे अरविंद झांबरे आणि सासू मंगल झांबरे यांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. तर चौथी आरोपी असलेली पायलची नणंद अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही. तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर करून त्यांच्या कोठडीची मागणी करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास स्वारगेट पोलीस करीत आहेत.








