पुणे: खराडीतुन धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याचा प्रकार खराडी पोलिसांनी उघडकीस आणला आहे. यावेळी पोलिसांनी थायलंड येथील 3 तरुणींसह 6 जणींची सुटका करत मॅनेजरला अटक केली आहे.
याबाबत स्पा सेंटरचा मॅनेजर लेनखोकै किपगेन (वय 30 वर्ष, रा. सिल्वर ब्युटी अँड वेलनेस, थिटे नगर, खराडी मुंढवा रोड, खराडी, मुळ रा. मणिपूर) याला अटक केली आहे़. स्पा सेंटरचा मालक विकास किशोर ढाले (वय 30 वर्ष, रा. 391, माहुली जहांगीर, अमरावती) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस अंमलदार पूजा डहाळे यांनी खराडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
अधिक माहिती अशी की, खराडी मुंढवा रोडवरील थिटेनगर येथे गोल्ड प्लाझा इमारत आहे. यामध्ये सिल्वर ब्युटी अँड वेलनेस नावाचे स्पा सेंटर आहे. या स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती खराडी पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवले. बनावट ग्राहकांनी इशारा करताच गुरुवारी 24 एप्रिल रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी या स्पावर छापा टाकुन 8 तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले. यातील दोन तरुणी परदेशी आहेत. तर इतर 6 तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याप्ररकरणी पोलिसांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच स्पा मॅनेजरला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण तपास करीत आहेत.