Monday, September 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ही दारू पिण्याची जागा आहे का?’ महिलेने जाब विचारताच तरुणांचं डोकं सटकलं; अंगावर कार घालून जीवे मारण्याचा प्रयत्न, पुण्यातील प्रकार

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 20 September 2026, 15:55

पुणे : बालेवाडीतील मैदानात कारमध्ये बसून मद्यपान करणाऱ्या दोघांना ‘ही दारू पिण्याची जागा नाही’ असे सांगितल्याच्या रागातून महिलेच्या अंगावर कार घालून तिला जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बाणेर पोलिसांनी कारचालकासह दोघांना अटक केली आहे. दिनेश दशरथ बिरादार (वय २३) आणि प्रशांत नवनाथ भोंडवे (वय २५), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, दोघेही बालेवाडी परिसरातील रहिवासी आहेत.

या प्रकरणी मनीषा संजय भंडारी (वय ४६) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. १६ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास त्या आपल्या श्वानाला फिरवण्यासाठी बालेवाडीतील दसरा चौक परिसरातील मैदानात गेल्या होत्या. त्यावेळी बिरादार आणि भोंडवे हे कारमध्ये बसले होते. भंडारी यांचा श्वान कारजवळ गेल्यानंतर आरोपींनी श्वान चावतो का, अशी विचारणा केली. त्यावर भंडारी यांनी श्वान चावत नसल्याचे सांगितले.

यानंतर भंडारी यांनी कारमध्ये दोघे मद्यपान करत असल्याचे पाहिले. त्यांनी ‘ही दारू पिण्याची जागा नाही’, असे सांगून श्वानाला घेऊन मैदानात फेरफटका मारण्यासाठी गेल्या. काही वेळाने परतल्यानंतर त्या जवळील कार्यालयाजवळ बसल्या होत्या. त्यावेळी कारमध्ये बसलेले दोघे मोठ्या आवाजात गाणी ऐकत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

फिर्यादीनुसार, त्यानंतर आरोपींनी कार त्यांच्या अंगावर घातली. कारची जोरदार धडक बसल्याने भंडारी यांच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. कारमधील प्रशांत भोंडवे याने शिवीगाळ करून धमकी दिल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

 

या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल केकाणे करीत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

“उरुळी कांचन येथे जेवणासाठी गाडी पार्क करताना काळाचा घाला” ऊसाच्या ट्रॉलीखाली पाय सापडून एकजण गंभीर जखमी

Monday, 21 September 2026, 18:24

गणेश उत्सवानिमित्त एसजीए ग्रुपचा स्त्युत्य उपक्रम, रक्तदान शिबिरात 111 बाटल्यांचे संकलन

Monday, 21 September 2026, 18:20

पुणेकरांच्या खिशाला बसणार मोठा फटका! पार्किंग शुल्कात तब्बल दुप्पट-तिप्पट वाढ करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव

Monday, 21 September 2026, 18:14

उरुळी कांचन येथील गारवा हॉटेल जवळ भरधाव वाहनाची तरुणाला धडक; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

Monday, 21 September 2026, 18:09

पुणे ‘सिपीं’चे आदेश हवेतच विरले? कवडीपाट टोलनाक्यावर विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट! लोणी काळभोर पोलिस काय कारवाई करणार?

Monday, 21 September 2026, 17:34

लोणी काळभोरमध्ये हडपसर-यवत उन्नत महामार्गासाठी 23 सप्टेंबरपासून जमीन मोजणी

Monday, 21 September 2026, 17:21
Next Post

सोन्याने गाठला विक्रमी उच्चांक! लग्नसराई आणि सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना मोठा धक्का; वाचा सोन्या-चांदीचा आजचा दर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp