Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“माझ्याशी पंगा घेण्याची कोणी हिंमत करेल असं वाटत नाही…”; तुकाराम मुंढेंचा लाचखोरांना सज्जड दम

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 16 August 2026, 22:16

पुणे : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त आणि आपल्या धडक कारवाईसाठी ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी लाचखोरी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा कठोर भूमिका मांडली आहे. राज्यभर अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर एफडीएकडून कारवाई सुरू असताना, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला.

राज्यभर सुरू असलेल्या कारवाईदरम्यान कोणी लाच देण्याचा प्रयत्न केला आहे का, असा प्रश्न मुंढे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी, “मला वाटत नाही की कोणी माझ्याशी पंगा घेण्याची हिंमत करेल. जर कोणी असा विचारही करत असेल, तर त्यांनी १०० वेळा विचार केला पाहिजे,” असे स्पष्ट केले.

अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात मुंढे यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेचे नागरिकांकडून स्वागत होत असून, त्यांच्या कारवाईला मोठा जनसमर्थन मिळत असल्याचे चित्र आहे.

“मी काही असाधारण काम करत नाही”

आपल्याला अनेक लोक प्रेरणास्थान मानतात, याबाबत विचारले असता तुकाराम मुंढे यांनी या कौतुकाचे श्रेय न घेता आपली भूमिका स्पष्ट केली. “मी कोणतेही असाधारण काम केलेले नाही. मी काही खूप मोठे किंवा वेगळे करतोय असे मला वाटत नाही. मी फक्त माझ्या पदाला आणि भूमिकेला साजेसे काम करण्याचा प्रयत्न करत आहे,” असे त्यांनी सांगितले.

 

समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपापली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली, तर एक चांगला आणि सक्षम समाज निर्माण होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले.

राजकारणात जाणार का?

तुकाराम मुंढे यांच्या राजकारणातील संभाव्य प्रवेशाबाबत सुरू असलेल्या चर्चांवरही त्यांनी भाष्य केले. आपल्या स्पष्टवक्त्या आणि प्रामाणिक स्वभावामुळे राजकारण आपल्यासाठी योग्य ठरेल असे वाटत नसल्याचे त्यांनी संकेत दिले.

“माझ्यासारखा अत्यंत स्पष्टवक्ता आणि प्रामाणिक माणूस राजकारणात स्वीकारला जाईल, असे मला अजिबात वाटत नाही,” असे मुंढे म्हणाले.

दरम्यान, अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर मुंढे यांनी भ्रष्टाचार आणि लाचखोरीबाबत घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे अन्न व्यवसाय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

UP निवडणुकीत Gen-Z योगींच्या बाजूने? सलग तिसऱ्यांदा भाजपला सत्ता मिळण्याची शक्यता; सर्व्हेतील आकडेवारीने राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 16 October 2026, 23:01

MPSC पेपरफुटी प्रकरणात तुकाराम मुंढेची एंट्री! चौकशीसाठी स्थापन केलेल्या आयोगाच्या समितीत मुंढेंची नियुक्ती; ‘या’ IAS अधिकाऱ्यांकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार

Friday, 16 October 2026, 20:54

शेतकऱ्यांसाठी धावून आले राज्यातले IAS आणि IPS अधिकारी! राज्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देणार स्वतःचा १ दिवसाचा पगार; वाचा सविस्तर

Friday, 16 October 2026, 20:40

पुढच्या वर्षीपासून लागू होणार ८वा वेतन आयोग? काम कुठपर्यंत आलं? काय-काय घडलं, जाणून घ्या सर्व अपडेट्स..

Friday, 16 October 2026, 20:36

फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र शेतकरी ओळखपत्र तयार करण्यास मनाई! अनधिकृत ओळखपत्रांची निर्मिती व वितरण थांबविण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Friday, 16 October 2026, 18:53

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा; पुणेकरांच्या तहानेचा प्रश्न ऐरणीवर! धरणातील पिण्याचे पाणी वाचवण्यासाठी मुंढवा जॅकवेल पूर्ण क्षमतेने चालवण्याची मागणी

Friday, 16 October 2026, 18:31
Next Post

अमेरिका-इराण युद्धानंतर भारताचा मोठा निर्णय! गॅस आयातीवरील अवलंबित्व संपवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp