पुणे: पुण्यातून अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याच्या दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. या घटना पुण्यातील धनकवडी आणि कोंढवा भागात घडल्या आहेत. धनकवडीत एका तरूणाने 9 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार मुलीच्या आईला समजताच त्यांनी धनकवडीतील 21 वर्षीय तरूणाविरुद्ध पोस्को अंतर्गत सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

तर दुसरीकडे पुण्यातील कोंढवा खुर्द परिसरातही एका 9 वर्षांच्या मुलीवर तिच्याच 17 वर्षांच्या सावत्र भावाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









