Sunday, May 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“त्याने माझा वापर करून मला सोडून दिलं” प्रेमसंबंधातून तरुणीची आत्महत्या? प्रियकराविरोधात गुन्हा; सोलापूरच्या युवतीचा पुण्यात दुर्दैवी अंत

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 24 May 2026, 13:51

पुणे, ता. २४ : प्रेमसंबंधातून मानसिक त्रासाला कंटाळून २३ वर्षीय तरुणीने मुळा-मुठा नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना खराडी परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी तरुणीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून प्रियकराविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे शहरात पुन्हा एकदा प्रेमसंबंध, फसवणूक आणि मानसिक छळाचा गंभीर मुद्दा ऐरणीवर आला आहे.

निकिता चारुदत्त आष्टेकर (वय २३, मूळ रा. माढा, जिल्हा सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. चैतन्य संजय कानडे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी निकिताचा भाऊ निखिल चारुदत्त आष्टेकर (वय 22, रा. सन्मती नगर, वैराग रोड, ता. माढा जि. सोलापुर) यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकिता आष्टेकर ही शिक्षण पूर्ण करून पुण्यात नोकरीसाठी आली होती. झेन्सार आयटी पार्क परिसरातील कंपनीत नोकरी करत असताना तिची ओळख नातेवाईकांतील चैतन्य संजय कानडे याच्याशी झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले आणि दोघेही विवाह करण्याच्या तयारीत असल्याचे निकिताने कुटुंबीयांना सांगितले होते.

दरम्यान, काही महिन्यांपासून दोघांमध्ये वाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. ४ मे रोजी रात्री निकिताने तिच्या भावाला मेसेज करून “त्याने माझा वापर करून मला सोडून दिले,” असा गंभीर आरोप केला होता. तसेच “लग्नाचे आश्वासन देऊन फसवणूक केली,” असेही तिने मेसेजमध्ये नमूद केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या संभाषणाचे स्क्रीनशॉटही पोलिसांकडे पुरावा म्हणून देण्यात आले आहेत.

दुसऱ्या दिवशी सकाळी निकिताने पुन्हा भावाला “चैतन्यशी बोल” असा मेसेज केला होता. मात्र त्याच दिवशी दुपारी खराडी पोलिसांनी कुटुंबीयांना फोन करून निकिताने मुंढवा पुलाजवळील मुळा-मुठा नदीपात्रात उडी घेतल्याची माहिती दिली. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवली. अखेर दुसऱ्या दिवशी दुपारी तिचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे आष्टेकर कुटुंबावर शोककळा पसरली असून, “प्रेमाच्या नावाखाली मानसिक छळ सहन करावा लागल्यानेच निकिताने टोकाचे पाऊल उचलले,” असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

खराडी पोलिसांनी चैतन्य संजय कानडे याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, मोबाइल चॅट, कॉल रेकॉर्ड आणि सोशल मीडियावरील संभाषणांची तपासणी सुरू केली आहे. या घटनेमुळे तरुणाईतील नातेसंबंध, मानसिक ताण आणि सोशल मीडियातून वाढणारे भावनिक संघर्ष पुन्हा चर्चेत आले आहेत.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कपाटामागे लपवली रोकड, फुलांच्या हाराच्या आडून पोबारा! आळंदी माऊली संस्थानला हादरवणारी धक्कादायक चोरी

Sunday, 24 May 2026, 14:52

कांदा विकून शेतकऱ्याच्या खिशातूनच गेले 301 रुपये! सोलापूर बाजार समितीतील प्रकारावर रोहित पवार आक्रमक; आंदोलनाचा इशारा

Sunday, 24 May 2026, 14:06

“त्याने माझा वापर करून मला सोडून दिलं” प्रेमसंबंधातून तरुणीची आत्महत्या? प्रियकराविरोधात गुन्हा; सोलापूरच्या युवतीचा पुण्यात दुर्दैवी अंत

Sunday, 24 May 2026, 13:51

व्यसनमुक्ती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव; डॉ. सोमनाथ गिते यांचा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

Sunday, 24 May 2026, 13:41
Thrill of torture after love marriage! Married woman strangled, saying 'You are Panauti'; Manjari police station registers case against husband and four others

प्रेमविवाहानंतर छळाचा थरार! ‘तु पनौती आहेस’ म्हणत विवाहितेचा गळा दाबला; मांजरी पोलीस ठाण्यात पतीसह चौघांवर गुन्हा

Sunday, 24 May 2026, 13:33

‘फर्निचर ऑक्शन’च्या आमिषाला अभियंता बळी; सायबर चोरट्यांनी 13 लाखांना घातला गंडा!

Sunday, 24 May 2026, 13:28
Next Post

कांदा विकून शेतकऱ्याच्या खिशातूनच गेले 301 रुपये! सोलापूर बाजार समितीतील प्रकारावर रोहित पवार आक्रमक; आंदोलनाचा इशारा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.