Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ऊसाच्या शेतातून पोलिसांवर गोळीबार करणारा सराईत गजाआड; महिनाभराच्या थरारानंतर पुणे पोलिसांचा मोठा विजय

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 15 June 2026, 22:34

पुणे: दिघी आणि रांजणगाव परिसरात पोलिसांवर गोळीबार करून फरार झालेल्या तसेच 70 हून अधिक चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने अटक केली आहे. शेखर संभाजी जाधव (वय 25, रा. मोधा, ता. उदगीर, जि. लातूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

13 मे 2026 रोजी दिघी परिसरात पोलिसांवर गोळीबार करून शेखर जाधव आणि त्याचे 3 साथीदार पसार झाले होते. या घटनेनंतर दिघी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान आरोपी रांजणगाव परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार 16 मे रोजी गुन्हे शाखेचे पथक तेथे पोहोचले.

रांजणगाव येथे पोलिसांनी शेखर जाधव आणि त्याचा साथीदार मुस्तफा उर्फ भाईजान यांचा पाठलाग केला. मात्र, आरोपींनी पुन्हा पोलिसांवर गोळीबार करत उसाच्या शेताचा आधार घेत घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यातही स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला.

यानंतर मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शोधमोहीम राबविण्यात आली. पोलिसांनी नांदेड, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांत अनेक वेळा जाऊन तपास केला. तसेच गोपनीय माहितीदारांच्या मदतीने आरोपीचा माग काढण्यात आला.

 

अखेर मिळालेल्या माहितीच्या आधारे 14 जून रोजी दिघी येथील मोझे शाळेजवळ सापळा रचून शेखर जाधव याला ताब्यात घेण्यात आले. अटकेदरम्यान त्याच्याकडून एक पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने केली.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दर्शनाहून परताना काळाचा घाला! नांदेडच्या तोटंबा घाटात कमांडर जीप झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार

Monday, 31 August 2026, 23:24

RBI आणि दिग्गजांचे सर्व अंदाज फोल ठरले! भारताच्या आर्थिक वाढीने अपेक्षेपेक्षाही गाठली उच्च पातळी

Monday, 31 August 2026, 23:09

सणासुदीच्या काळात सामान्यांना मोठा दिलासा! साखरेच्या कारखान्यातील दरात थेट ३० टक्क्यांची घसरण

Monday, 31 August 2026, 22:48

मालाडमध्ये भरधाव कारने तब्बल २० जणांना उडवले! महिलेचा जागीच मृत्यू; अपघातग्रस्तांचा आक्रोश, तर आरोपीला पोलिसांत व्हीआयपी ट्रिटमेंट?

Monday, 31 August 2026, 21:39

200 वर्षांनंतर घरात चिमुकलीचा जन्म? रथातून मिरवणूक काढून लेकीचे दणक्यात स्वागत!

Monday, 31 August 2026, 20:53

अमित ठाकरेंनी काढला पंतप्रधान मोदींचा फोटो; पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मोठा राडा, २५ जणांवर गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 20:20
Next Post

पेट्रोल-डिझेलपाठोपाठ आता सीएनजीचाही 'करंट'! सलग पाचव्यांदा दरवाढ; पुणेकरांचे बजेट कोलमडले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp