Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांसाठी मोठी खूशखबर! निगडी ते चाकण मेट्रो मार्गाच्या डीपीआरला मंजुरी; तब्बल १२,९३७ कोटींचा मेगाप्रकल्प मार्गी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 4 September 2026, 13:22

पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या निगडी-चाकण मेट्रो मार्गाच्या सविस्तर प्रकल्प आराखड्याला (डीपीआर) पिंपरी-चिंचवड महापालिकेने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे पिंपरी-चिंचवडसह चाकण आणि हिंजवडी आयटी पार्क परिसर मेट्रोच्या माध्यमातून जोडला जाणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे १२ हजार ९३७ कोटी २३ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत निगडी-चाकण मेट्रो मार्गिकेचा विषय चर्चेसाठी मांडण्यात आला. महापौर रवी लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत रात्री उशिरापर्यंत विविध विषयांवर चर्चा सुरू होती. सभेच्या सुरुवातीलाच मेट्रोचा विषय दाखल करून घेण्यात आला.

प्रस्तावित मेट्रो मार्गावर पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीत २४ स्थानके, तर निगडी ते चाकण या संपूर्ण मार्गावर एकूण ३४ स्थानके असणार आहेत. प्रकल्पासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सुमारे ३३० कोटी रुपयांचा आर्थिक हिस्सा राहणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येकी १ हजार ७२१ कोटी ७१ लाख रुपयांचा निधी देणार आहेत.

मेट्रो मार्गाबाबत यापूर्वी नगरसेवकांसमोर दोन वेळा सादरीकरण करण्यात आले होते. सर्वसाधारण सभेत सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी हा विषय मांडला, तर शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी त्याला अनुमोदन दिले. डीपीआरमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी ज्ञानेश्वर जगताप यांनी उपसूचना मांडली. भोसरी येथील सध्याचा पूल न पाडता त्याच परिसरातून मेट्रो प्रकल्पाची उभारणी करावी, अशी मागणी या उपसूचनेत करण्यात आली. महापौर रवी लांडगे यांनी या उपसूचनेसह मेट्रोच्या डीपीआरला मंजुरी दिली.

 

निगडीतील भक्ती-शक्ती समूहशिल्प चौकातून या मेट्रो मार्गाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर ट्रान्सपोर्टनगर, गणेशनगर, मुकाई चौक, रावेत, पुनावळे, ताथवडे गाव, भुमकर चौक आणि भुजबळ चौक मार्गे मेट्रो वाकडपर्यंत पोहोचेल.

वाकड येथे हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेवरील वाकड स्थानकाशी या मार्गाची जोडणी होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना येथे मेट्रो बदलून हिंजवडी आणि शिवाजीनगरच्या दिशेने प्रवास करता येणार आहे.

वाकडनंतर विशालनगर कॉर्नर, कोकणे चौक, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा, संत तुकारामनगर, वल्लभनगर, गवळीमाथा चौक, सेंच्युरी एन्का कॉर्नर, लांडेवाडी, भोसरी गाव, सेक्टर क्रमांक १, एमआयडीसी, वखार महामंडळ गोदाम चौक आणि पीआयईसी या भागातून मेट्रो पुढे जाणार आहे.

यानंतर मोशीतील भारतमाता चौक, चिंबळी फाटा, बर्गेवस्ती, कुरळी, आळंदी फाटा आणि नाणेकरवाडीमार्गे मेट्रो चाकणपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे औद्योगिक पट्ट्यासह मोठ्या प्रमाणावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना या मार्गाचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बोऱ्हाडेवाडी ते वाकड चौक या बीआरटीएस मार्गावर ई-बीआरटीएसच्या माध्यमातून सार्वजनिक प्रवासी वाहतूक सुरू करण्यासही मंजुरी देण्यात आली. यासोबतच शहरातील वाहतूक आणि पार्किंगची समस्या लक्षात घेता संपूर्ण पिंपरी-चिंचवडमध्ये पार्किंग धोरण लागू करण्यासही सभेने मान्यता दिली.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद! तुमच्या राज्यात किती दिवस बँकिंग सेवा राहणार ठप्प? जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Tuesday, 29 September 2026, 17:57

मंत्रिमंडळाचे १० मोठे निर्णय! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी; वाचा सविस्तर

Tuesday, 29 September 2026, 17:19

सचिन वाझेंना दिलासा! मनसुख हिरेन हत्या अन् अँटिलिया स्फोटक प्रकरणात अटी शर्थीसह जामीन मंजूर

Tuesday, 29 September 2026, 17:18

केतन अग्रवाल प्रकरणात मोठा खुलासा! सोशल मीडिया अन् Google Searchवरून रचला कट; चार्जशीटमधून धक्कादायक माहिती समोर

Tuesday, 29 September 2026, 16:55

लोणी काळभोर सोसायटीची 109 वी सर्वसाधारण सभा उत्साहात

Tuesday, 29 September 2026, 16:51

‘त्या’ जेलमध्ये नेमकं घडतंय काय? वाल्मिक कराड प्रकरणात धनंजय देशमुखांची तक्रार; दोन पोलिस निलंबित

Tuesday, 29 September 2026, 16:35
Next Post

सोनं आज स्वस्त झालं, पण थांबा! वर्षअखेरीस भाव कुठे पोहोचणार? वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp