Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५२३ कोटींचे कर्ज होणार माफ; तब्बल ६१ हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 16 August 2026, 20:39

पुणे : राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा पुणे जिल्ह्यातील ६१ हजार ९०० शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे प्रत्येकी दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार असून, जिल्ह्यात एकूण ५२३ कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) वतीने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जन्मदिनानिमित्त शेतकऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानावर आधारित अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजनेचा शुभारंभ सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमाला सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, पीडीसीसी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शितोळे आणि म्हाडा पुणेचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांची उपस्थिती होती.

एआयच्या वापरामुळे शेतीत उत्पादन वाढणार

अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजनेंतर्गत जिल्हा बँकेच्या माध्यमातून एक हजार कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढवल्यास उत्पादनात वाढ होण्यासोबतच पाण्याची बचत आणि खतांचा वापर कमी होण्यास मदत होईल, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. विशेषतः ऊस शेतीमध्ये एआयचा वापर वाढवल्यास उत्पादनात ४० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते, असा दावा त्यांनी केला.

 

३१ मार्च २०२७ पर्यंत थकीत रक्कम भरण्याची संधी

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफी योजनेबाबत अधिक माहिती दिली. लोकप्रतिनिधी, व्यावसायिक आणि आयकर भरणारे शेतकरी या योजनेतून वगळण्यात आले आहेत. पात्र शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२७ पर्यंत दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असलेली थकीत रक्कम भरल्यास राज्य सरकारकडून दोन लाख रुपये जमा करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यातील कर्जमाफीचे चित्र

-६१,९०० शेतकरी : कर्जमाफीसाठी पात्र
– २ लाख रुपये : प्रत्येक शेतकऱ्याला मिळणारी कमाल कर्जमाफी
– ५२३ कोटी रुपये : एकूण कर्जमाफीचे मूल्य

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून, केवायसी पूर्ण केलेल्या पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. पात्र शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे आणि माजी खासदार डॉ. भागवत कराड यांनी केले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे-पिंपरीत रॅपिडो बाइक टॅक्सीवरून वाद पेटला ! सेवा बंद करण्याचे आदेश; नेमकं कारण काय?

Thursday, 15 October 2026, 18:36

लाडक्या बहिणी थेट देवभाऊंच्या बंगल्यावर धडकणार? योजनेचे १५०० रुपये बंद झाल्याने आंदोलनाचा इशारा; नेमकं प्रकरण काय?

Thursday, 15 October 2026, 18:23

MPSC चौकशी आयोगाच्या सचिवपदावरून तुकाराम मुंढेंचा मोठा खुलासा! नेमकं काय घडलं?

Thursday, 15 October 2026, 18:20

ओव्हरलोडचे हप्ते घेऊनही आरटीओ कडून कारवाई – वाहनमालक संजय कांगणे यांचा गंभीर आरोप

Thursday, 15 October 2026, 17:54

पूर्व हवेलीत मुळा-मुठा कालवा दुथडी भरून, पण विजेअभावी पिके चालली सुकून! शेतकरी हवालदिल

Thursday, 15 October 2026, 17:44

पीडीसीसी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल; प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध, राजकीय हालचालींना वेग

Thursday, 15 October 2026, 17:38
Next Post

रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे उद्योगांवर संकट! अखेर उद्योगमंत्र्यांच्या धावपळीनंतर १० महिन्यांची डेडलाईन फिक्स

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp