Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“मांजरीच्या दूध-बिस्किटासाठी 200 रुपये दे, नाहीतर तुझ्यावर” लोणी काळभोर महिला वाहतुक पोलिसाची वाहनचालकाकडे अजब मागणी..

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 17 March 2026, 14:57
"Give me Rs 200 for the cat's milk and biscuits, otherwise it's on you" - Loni Kalbhor, a strange demand from a female traffic policeman to a driver..

लोणी काळभोर, ता. 17 : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी (ता.16) नेहमीसारखीच धावपळ सुरू होती. सूर्य डोक्यावर आला होता… आणि कवडीपाट टोलनाक्याजवळ एक तरुण त्याची जुनी दुचाकी घेऊन कामासाठी निघाला होता. त्याला काय माहिती… पुढे त्याच्यासोबत काय घडणार आहे! रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका महिला वाहतूक पोलिसांच्या नजरेत त्याची गाडी पडली. हात वर करून त्याला थांबवण्यात आलं. (Latest Marathi News)

“गाडी बाजूला लाव…” आदेश आला. तरुण थोडा घाबरला. गाडीची नंबर प्लेट तुटलेली होती, हे त्याला माहित होतं. तो नम्रपणे म्हणाला, “मॅडम, चूक झाली… माफ करा.” क्षणभर शांतता पसरली… पण पुढचं वाक्य ऐकून तो थक्क झाला! “दंड वगैरे काही घेत नाही… आमच्या मांजरीसाठी दूध घेऊन ये… आणि बिस्किटसाठी 200 रुपये दे… मग जा!” तरुणाला वाटलं, कदाचित तो चुकीचं ऐकत असेल… पण नाही… आवाज पुन्हा आला. यावेळी अधिक कठोर. “पैसे दिल्याशिवाय गाडी सोडणार नाही!”

त्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास नाहीसा झाला. खिशात हात घातला… पण फक्त काही सुट्टे पैसे. तो हळू आवाजात म्हणाला, “मॅडम, माझ्याकडे पैसे नाहीत… मी गरीब आहे…” पण कायद्याचा आधार देणाऱ्यांनीच त्याची विनंती फेटाळली. घाम फुटला… डोळ्यांसमोर काम, घर, जबाबदाऱ्या सगळं तरळू लागलं.

 

शेवटी त्याने मित्राला फोन केला. मित्राने त्याला पैसे घेण्यासाठी बोलावले. काही वेळात 250 रुपये मिळाले… आणि त्याने ती ‘फर्माईश’ पूर्ण केली. तो निघून गेला… पण मनात एकच प्रश्न घेऊन, हा दंड होता का? की कायद्याच्या नावाखाली झालेला सौदा? त्या दिवशी फक्त एक तरुण नाही… तर कायद्यावरील विश्वासही थोडा हादरला.

रस्त्यावर उभा असलेला पोलिस गणवेश… जो सुरक्षिततेचं प्रतीक असतो… तोच काही क्षणांसाठी भीतीचं कारण बनला.आणि आता हा प्रश्न प्रत्येक नागरिकांच्या मनात घुमतोय.“जर रक्षण करणारेच सौदा करू लागले… तर सामान्य माणसाने न्याय कुणाकडे मागायचा?” अशा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

लोणी काळभोर परिसरात वाहतूक पोलिसांच्या कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, “नियम फक्त सामान्यांसाठीच का?” असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. महिला, विद्यार्थी आणि शेतकरी यांच्या गाड्या अडवून किरकोळ कारणांवरून दंडात्मक कारवाई केली जाते, तर दुसरीकडे अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने मात्र बिनधास्तपणे रस्त्यावर धावताना दिसत आहेत. या दुहेरी धोरणामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “ज्यांच्यावर कारवाई व्हायला हवी, त्यांच्याकडे दुर्लक्ष… आणि जे नियम पाळतात, त्यांनाच त्रास” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत

दरम्यान, या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेत नागरिकांचे एक शिष्टमंडळ लवकरच पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांची भेट घेऊन अधिकृत तक्रार करणार असल्याची माहिती समोर आली आहे. वाहतूक पोलिसांचा असा अनागोंदी आणि मनमानी कारभार वारंवार सुरू असतानाही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सोलापूर हादरले! रेल्वेसमोर उडी मारून आईसह १४ वर्षांच्या मुलीची आत्महत्या; परिसरात पसरली शोककळा

Sunday, 26 July 2026, 22:57

नीट पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी थेट ‘हाय-पावर टास्क फोर्स’ स्थापन!

Sunday, 26 July 2026, 22:30

शेतकऱ्यांनो सावधान! या ३ चुकांमुळे अडकू शकतो तुमचा २००० रुपयांचा हप्ता; वाचा सविस्तर माहिती

Sunday, 26 July 2026, 21:56

मी ‘रॉ’चा माणूस आहे म्हणत फसवलं! व्यापाऱ्याचे बँक खाते फ्रीज करून लाखांची खंडणी उकळणारा तोतया जेरबंद

Sunday, 26 July 2026, 21:10

माळशेज घाटात थरारक दुर्घटना! तब्बल १०० मीटर रस्ता ५ ते ६ फूट खाली खचला; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 26 July 2026, 20:16

बारामतीत अपघाताचा थरार! हादरली! भरधाव ट्रकच्या धडकेत सख्ख्या भावांपैकी एकाचा जागीच मृत्यू

Sunday, 26 July 2026, 19:54
Next Post
Mumbai Pune New Highway: The country's longest 10-lane "multi-layer" road in Pune! The 53 km highway will directly connect JNPT port; Amol Kolhe's efforts are a success

Mumbai Pune New Highway: देशातील सर्वात लांब 10-पदरी "मल्टी-लेयर" मार्ग पुण्यात! 53 किमीचा हायवे थेट JNPT बंदराला जोडणार; अमोल कोल्हेंच्या प्रयत्नांना यश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.