संदीप टूले
Daund News : दौंड : राजेगाव (ता.दौंड) येथे मागिल आठवड्यापासून शिंग्रोबा माळ येथे बिबट्याची दहशत पहायला मिळत आहे. बिबट्याने एका पाळीव कुत्र्याला ठार मारून अर्धवट खाऊन टाकल्याची धक्कदायक घटना रविवारी (ता.३०) उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शिंग्रोबामाळ परिसरातील शेतकऱ्यांमध्ये धडकी भरली आहे.
वनविभागाने तात्काळ पिंजरा लावावा….
बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांची शेतातील कामे रखडली असून शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यामुळे शेतकरी मात्र पूर्ण हवालदिल झाला आहे. येथील नागरिक, लहान मुले,महिला, वृद्ध घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत.
दरम्यान, भटक्या कुंत्र्यांची संख्या फार झपाट्याने कमी होऊ लागली आहे. या बिबट्याने त्यांचा फाडशा पाडलेला असावा असा अंदाज येथील नागरिक व्यक्त करीत आहेत. Daund News
यावेळी बोलताना राजेगावचे सरपंच माऊली लोंढे म्हणाले कि, नागरिकांचा व पाळीव प्राण्यांचा नाहक बळी जाऊ नये. म्हणून वनविभागाने तात्काळ पिंजरा लावावा. तसेच यासंबंधित वनविभागाशी ग्रामपंचायतीच्या वतीने पत्रव्यवहार देखील करण्यात आला आहे. Daund News
पिंजऱ्याची मागणी आम्ही वरती केलेली आहे. आम्हाला उपलब्ध झाला की पिंजरा लगेच लावण्यात येईल. आणि आमचे कर्मचारी वेळोवेळी स्थळ पाहणी करत आहेत…
कल्याणी गोडसे (वन अधिकारी – दौंड)