Sunday, November 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात अंमली पदार्थ विक्रेत्यांवर गुन्हे शाखेचा छापा; एमडीसह 7 लाखांचा मुद्देमाल जप्त!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 15 November 2026, 14:53

पुणे, ता. 15 : पुणे शहरात अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक क्रमांक 2 ने मार्केटयार्ड परिसरात छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले. या कारवाईत तब्बल 24.63 ग्रॅम वजनाचा मॅफेड्रोन (एमडी) हा अंमली पदार्थ, मोबाईल फोन, ऑटो रिक्षा आणि रोख रकमेसह एकूण 7 लाख 5 हजार 429 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 14 नोव्हेंबर 2026 रोजी पोलीस निरीक्षक जीवन माने, सहायक पोलीस निरीक्षक अफरोज पठाण आणि त्यांच्या पथकातील कर्मचारी मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थविरोधी कारवाईच्या अनुषंगाने गस्त घालत होते.

यावेळी गुलटेकडी येथील वारणा सहकारी बँक लिमिटेडच्या इमारतीलगत, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर, उत्सव समिती चौक ते गंगाधामकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका काळ्या-पिवळ्या रंगाच्या बजाज ऑटो रिक्षामध्ये तिघे संशयास्पदरीत्या बसलेले पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिसांनी तत्काळ तिघांना ताब्यात घेत पंचांच्या उपस्थितीत त्यांची अंगझडती घेतली. यावेळी त्यांच्याकडून 4 लाख 92 हजार 600 रुपये किमतीचा 24.63 ग्रॅम मॅफेड्रोन (एमडी), 60 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन, 1 लाख 50 हजार रुपये किमतीची ऑटो रिक्षा आणि 2 हजार 829 रुपये रोख रक्कम असा एकूण 7 लाख 5 हजार 429 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी पोलिसांनी सुभाषगौडा गुरन्ना चौधरी (वय 32), बाप्पू भिमा बाळशंकर (वय 28) आणि शाहरुख मेहबूब खान (वय 28, सर्व रा. मार्केटयार्ड, पुणे) यांना ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अंमली पदार्थांच्या या व्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत पोलीस तपास करत आहेत.
अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांविरोधात पुणे पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे मार्केटयार्ड परिसरात खळबळ उडाली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह. पोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे तेजस्वी सातपुते, पोलीस उप-आयुक्त, गौहर हसन, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन माने,सहाय्यक पोलीस निरीक्षक अफरोज पठाण, तसेच पोलीस अंमलदार अमोल जगताप, सतीश चव्हाण, शरद धांडे, संदिप देवकाते, योगेश मांढरे, योगेश कुंभार,पोलीस अंमलदार सुरेखा साबळे, जानवी सुर्यवशी, सुकेशिनी आंबले, पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे, अंमली पदार्थ विरोधी पथक 2, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केली आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सोरतापवाडी येथे दिवाळीसाठी मावशीकडे आलेल्या 15 वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू; वाघोली अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला

Sunday, 15 November 2026, 16:30

नाव आणि फोटोचा गैरवापर केल्यास कठोर कारवाई; रुपाली चाकणकर यांचा स्पष्ट इशारा!

Sunday, 15 November 2026, 16:29

पंढरपुरात भयंकर दुर्घटना! ३० फूट खोल विहिरीचे काम सुरू असताना कोसळला दगड-मातीचा ढिगारा; चार कामगार अडकल्याची भीती

Sunday, 15 November 2026, 16:09

सोन्या-चांदीच्या दरात उलथापालथ! चांदी थेट 15 हजारांनी स्वस्त; 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

Sunday, 15 November 2026, 15:55

टीम इंडियाचा न्यूझीलंडवर २२ धावांनी विजय; पाच सामन्यांची वनडे मालिका ३-१ ने जिंकली

Sunday, 15 November 2026, 15:42

500 कोटींच्या ऑडिओ क्लिपचं गूढ वाढलं! मनोज जरांगेंनी ‘त्या बाई’बाबत केला मोठा दावा….

Sunday, 15 November 2026, 15:31
Next Post

मुंबईत खळबळ! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp