Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील ढोल-ताशा पथकांसाठी काँग्रेसकडून महापालिकेला निवेदन; केली ‘ही’ मागणी…

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 8 July 2025, 18:27

पुणे: गणेशोत्सव मिरवणुकांमध्ये आकर्षण ठरणाऱ्या ढोल-ताशा पथकांसाठी सरावाची अधिकृत जागा आणि वाद्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने पुणे महापालिकेकडे केली आहे. या मागणीसंदर्भात काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना निवेदन सादर केले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध ढोल-ताशा पथके महिनाभर आधीपासून सराव सुरू करतात. मात्र, सरावासाठी निश्चित जागा नसल्याने त्यांना निवासी परिसरांमध्ये सराव करावा लागतो. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर महापालिकेने नदीपात्रातील जागांमध्ये अधिकृत गाळे तयार करून नियोजित वेळेनुसार पथकांना सरावासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तिवारी यांनी दिलेल्या निवेदनानुसार, मागील वर्षी मुठा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक पथकांची वाद्ये वाहून गेली होती. ढोल-ताशे ही वाद्ये महागडी असल्याने ती पुन्हा खरेदी करणे पथकांसाठी आर्थिकदृष्ट्या नुकसानदायक ठरते. त्यामुळे वाद्ये सुरक्षित ठेवण्यासाठी शाळांमध्ये खोल्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी विनंतीही निवेदनात करण्यात आली आहे.

त्याचबरोबर, या अधिकृत जागांचा वापर करणाऱ्या पथकांकडून नाममात्र शुल्क आकारण्याची शिफारसही करण्यात आली आहे. ढोल-ताशा, झांज, लेझीम यांसारख्या पारंपरिक खेळांमुळे गणेश विसर्जन मिरवणुकांचे स्वरूप भव्य झाले असून, तरुणांनी यात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतल्याचेही तिवारी यांनी नमूद केले.

महापालिकेने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून गणेशोत्सवाच्या पारंपरिक आणि सांस्कृतिक समृद्धतेला चालना द्यावी, असे आवाहन काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

वीज पडून मृत्यू झाल्यास वारसांना मिळणार ४ लाखांची आर्थिक मदत; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय!

Monday, 16 November 2026, 23:09

सिंहगड इन्स्टिट्यूटला पुणे महापालिकेचा दणका! २९५ कोटींच्या थकबाकीसाठी ३३ मिळकतींवर बोजा चढविण्याची तयारी

Monday, 16 November 2026, 23:07

भारतातून थेट नेपाळला रेल्वे प्रवास! अयोध्या-जनकपूरदरम्यान २१ नोव्हेंबरपासून साप्ताहिक सेवा सुरू होणार

Monday, 16 November 2026, 23:05

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील PSI २० हजारांची लाच घेताना जाळ्यात; लोणावळ्यात ACBची कारवाई

Monday, 16 November 2026, 22:24

भोर तालुक्यात पोलीस पाटील अशोक साधू येनपुरे यांचा खून! घटनेने परिसरात खळबळ; पोलीस तपास सुरु

Monday, 16 November 2026, 21:57

वाहनांसाठी पसंतीचा नंबर हवा आहे? पिंपरी-चिंचवड RTO कडून नोंदणी क्रमांक आरक्षणाची प्रक्रिया जाहीर

Monday, 16 November 2026, 21:31
Next Post

"तुला सरकारी नोकरी लावून देतो" म्हणत शकुनी मामाचा कारनामा; भाच्याला लाखोंचा गंडा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp