Thursday, May 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhigwan : उजनी पाणलोट क्षेत्रातील धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या अतिक्रमण नोटीसांना विखे पाटलांकडून स्थगिती – हर्षवर्धन पाटील

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 4 March 2026, 21:33

प्रतिनिधी सागर जगदाळे

Bhigwan : भिगवण :  दि. 4 : उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील धरणग्रस्त शेतकऱ्यांना जलसंपदा विभागाने दिलेल्या अतिक्रमण हटाव नोटीसांना तात्काळ स्थगिती देण्याचा व या गाळपेर जमिनी धरणग्रस्त शेतकऱ्यांना कराराने भाडेपट्ट्यावर देण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला आहे. जलसंपदा मंत्र्यांकडून उजनी पाणलोट क्षेत्रातील संबंधित बहुतांश प्रश्न हे सांघिक प्रयत्नांमुळे मार्गी लागले असल्याने धरणग्रस्त शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, अशी माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जलसंपदा मंत्र्यांच्या बैठकीनंतर बुधवारी (दि. 4) दिली. तसेच यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त केले.

उजनी धरणग्रस्तांच्या विविध मागण्यांचे निवेदन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मुंबईत भेट घेऊन नुकतेच बुधवारी (दि. 25 फेब्रु.) दिले होते. त्यानुसार आज बुधवारी (दि. 4 मार्च) मुंबईत ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमवेत झालेल्या बैठकीतील निर्णयांची सविस्तर माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली. या बैठकीस कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री सदाभाऊ खोत आदी मान्यवर उपस्थित होते.

 

हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, उजनी पाणलोट क्षेत्रातील इंदापूर, दौंड, कर्जत, करमाळा, माढा या तालुक्यातील सुमारे 13 हजार हेक्टर संपादित व वहिवाट असलेली गाळपेर जमीन जाहीर प्रकटन करून धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना 11/11 महिन्यांच्या कराराने, 12 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.

उजनी धरणाला लागून मोठी भिंत आहे. तिथे फ्लोटिंग (तरंगता) सोलर पॉवर एनर्जी प्रकल्प नियोजित आहे. मात्र या प्रकल्पाची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना देऊन व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच या प्रकल्पाबाबत पुढील निर्णय घेण्याचे ठरले आहे. तसेच उजनी धरणालगत 350 हेक्टर जमीन आहे. याठिकाणी पर्यटन केंद्र प्रस्तावित आहे. मात्र सध्या तेथे 60 ते 70 हेक्टर जमीन शेतकरी वहिवाटत आहेत. तसेच उजनी गावठाण येथेही 250 ते 300 हेक्टर जमीन असून तेथेही पर्यटन केंद्र प्रस्तावित आहे. तिथेही शेतकरी जमीन वहिवाटत आहेत. या दोन्ही ठिकाणी शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. या दोन्ही ठिकाणांचा सविस्तर अहवाल तयार होईपर्यंत पुढील कार्यवाही करण्यात येऊ नये, असा धरणग्रस्त शेतकऱ्यांना दिलासादायक निर्णय बैठकीत जलसंपदा मंत्री ना. विखे पाटील यांनी घेतल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, उजनीची कॉलनी (वसाहत) आहे, तिथे लोक राहतात. मग आता हा सगळा प्रकल्प झाल्यानंतर एकतर रांझणी किंवा उजनी गाव यामध्ये वर्ग करावे किंवा त्याला स्वतंत्र गावठाण करावे आणि स्वतंत्र महसूल सजा करावी, या संदर्भातही बैठकीत चर्चा झाली.

तसेच अधिवेशन संपल्यानंतर पुणे येथे कृष्णा खोरे महामंडळाच्या कार्यालयात धरणग्रस्त शेतकऱ्यांसमवेत सविस्तर बैठक घेण्याचे आजच्या बैठकीत ठरले आहे. उजनी पाणलोट क्षेत्रातील धरणग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, असा विश्वासही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

कांदा उत्पादकांचे अच्छे दिन! साखर आणि फळ उत्पादकांसाठीही दिल्लीत झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Wednesday, 27 May 2026, 20:52

जामिनावर सुटका होताच अग्रवाल कुटुंबाचा जल्लोष; मृत अश्विनीच्या वडिलांचा संताप, जामीन रद्द करण्याची मागणी

Wednesday, 27 May 2026, 20:26

80 वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील ‘बकुळा माळ’ हिसकावून चोरटे फरार; भोरमध्ये भरदिवसा चोरी

Wednesday, 27 May 2026, 20:12

देवाच्या दारात गुंडागर्दी! मंदिरातील पैसे घेण्यास विरोध केल्याने पुजाऱ्याचा तोडला दात; मांजरी बुद्रुक येथील घटना

Wednesday, 27 May 2026, 20:04

अंगणात खेळत असताना 16 वर्षाच्या मुलावर चौघांकडून लोखंडी हत्याराने वार; हडपसर येथील घटना

Wednesday, 27 May 2026, 19:55

भारताविरोधात मोठा कट उधळला! कराचीमार्गे गुजरातमध्ये पोहोचले जहाज; मध्यरात्रीच्या गुपित मिशनमध्ये मोठी कारवाई

Wednesday, 27 May 2026, 19:06
Next Post

Chhatrapati Sambhajinagar: शेतात कापूस नाही तर चक्क गांजा! छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध लागवडीचा पर्दाफाश; ३४ किलो गांजासह एकाला बेड्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.