Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bandu Andekar: पुण्यात जेलमधून होणार प्रचार! आंदेकर टोळी पोलीस बंदोबस्तात ‘फॉर्म’ भरणार; ‘या’ प्रभागात होणार हाय-व्होल्टेज लढत

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 26 December 2025, 18:07
Bandu Andekar: Campaigning will take place from jail in Pune! Andekar gang will fill 'forms' under police protection; High-voltage fight will take place in 'this' ward

पुणे: आगामी पुणे महानगरपालिका (Bandu Andekar) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुख्यात गुंड (Andekar Gang) सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर आणि त्याच्या कुटुंबीयांनी (Vanraj Andekar) निवडणूक लढवण्याची तयारी (Pune Crime) केल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. सूर्यकांत आंदेकर याच्यासह माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या पत्नी सोनाली आंदेकर या देखील निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे आंदेकर कुटुंब ही निवडणूक थेट जेलमधून लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Latest Marathi News)

न्यायालयाची परवानगी

पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आंदेकर कुटुंब इच्छुक असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्यांनी न्यायालयात परवानगी मागितली होती. न्यायालयाने लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर आणि सूर्यकांत आंदेकर यांना उमेदवारी अर्ज भरण्याची परवानगी दिली आहे. तसेच या प्रक्रियेदरम्यान कडक पोलीस बंदोबस्त देण्याचे आदेशही पोलिसांना देण्यात आले आहेत.

पोलीस बंदोबस्तात अर्ज भरणार

न्यायालयाच्या आदेशानुसार उमेदवारी अर्ज दाखल करताना आंदेकर कुटुंबाला पोलीस एस्कॉर्ट व्हॅन उपलब्ध करून दिली जाणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आंदेकर कुटुंबाला निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याचा मार्ग खुला झाला आहे.

जमीन नाकारला पण…

यापूर्वी न्यायालयाने लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना निवडणूक लढवण्याची परवानगी दिली होती. मात्र त्याचवेळी त्यांचे जामीन अर्ज फेटाळण्यात आले होते. त्यामुळे सध्या सूर्यकांत आंदेकर, लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर हे तिघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. जामीन नाकारण्यात आल्याने अडचणी वाढल्या असल्या तरी निवडणूक लढवण्याचा अधिकार कायम ठेवण्यात आला आहे.

 

जेलमधूनच प्रचार

न्यायालयाच्या परवानगीमुळे आंदेकर कुटुंब आता कारागृहातूनच निवडणूक लढवणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यांना तात्पुरत्या स्वरूपात पोलीस बंदोबस्तात जेलमधून बाहेर आणले जाणार आहे. आंदेकर कुटुंबाच्या या निर्णयामुळे पुण्यातील राजकारणात चर्चांना उधाण आले असून, मतदारांचा प्रतिसाद काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यातील भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत FDA ची धाड! नेत्यांसाठी आलेल्या जेवणाची अचानक तपासणी झाल्याने खळबळ

Monday, 31 August 2026, 18:37

उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘नाराजी नाट्य’ रंगण्याचे संकेत! दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारमध्येच ठिणगी पडण्याची शक्यता

Monday, 31 August 2026, 18:04

घरच्यांशी भांडून निघाली, स्लीपर बसमध्ये बसली अन् पुढे 47 किलोमीटरचा थरार! चालत्या बसमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार..

Monday, 31 August 2026, 17:35

गणेशोत्सवात डीजेवर बंदी? मुख्यमंत्र्यांचे मोठे संकेत; पुण्यातून ध्वनिप्रदूषणाविरोधात कडक आवाहन

Monday, 31 August 2026, 17:06

केडगाव रेल्वे स्टेशन परिसरातील मोटार सायकल चोरी करणारा आरोपी जेरबंद! आरोपीकडून ७ मोटारसायकल जप्त; यवत पोलीसांची कामगिरी

Monday, 31 August 2026, 16:56

महिलांवर लैंगिक अत्याचार अन् भीतीचा बागलबुवा; १७ गुन्हे दाखल असलेल्या भोंदूबाबाच्या अडचणी वाढल्या!

Monday, 31 August 2026, 16:52
Next Post
Accident

Accident : काळाचा घाला! शाळेतून घरी परतणाऱ्या दोन जिवलग मैत्रिणींना भरधाव टेम्पोने चिरडले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp