पुणे : मी भाजपसोबत यावं यासाठी माझ्या घरी हसन मुश्रीफ पाच तास बसून होते. मला पाहिजे ते मंत्रीपद द्यायला सुद्धा तयार होते. असा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केला आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची काल बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषद पार पडली.(Sharad Pawar)
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पक्षाचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीदेखील जोरदार समाचार घेतला आहे. दरम्यान, या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी अजित पवार गटाने केलेले दावे धुडकावून लावत काही गोष्टी मला पहिल्यांदाच समजल्या असल्याचे शरद पवार म्हणाले. (Anil Deshmukh)
राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर प्रथमच उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शरद पवार गटावर हल्लाबोल केला आहे. त्यानंतर, आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी अनिल देशमुख यांच्याबद्दलही मोठा गौप्यस्फोट केला होता. ते म्हणाले, अनिल देशमुख माझ्यासोबत सर्व बैठकीला हजर होते. केवळ मंत्रीपद न मिळाल्याने ते दुसऱ्या गटासोबत गेल्याचं अजित पवारांनी म्हटलं होतं. त्यावर, आता देशमुख यांनी पलटवार करत मोठा गौप्यस्फोट केला आहे. (Ajit Pawar)
नेमकं काय म्हणाले अनिल देशमुख?
ज्या भारतीय जनता पक्षाने मला खोट्या प्रकरणात फसवलं, त्या पक्षासोबत जाण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांच्यासोबत जाण्यासाठी हवं ते खातं देण्याची त्यांची तयारी होती. ज्यांनी मला फसवलं त्यांच्यासोबत मला जायचं नव्हतं. मी भाजपसोबत यावं यासाठी माझ्या घरी हसन मुश्रीफ पाच तास बसून होते. मला पाहिजे ते मंत्रीपद द्यायला सुद्धा तयार होते. मात्र, मी कायम शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे अजित पवार यांना सांगितले असल्याचे देशमुख यांनी म्हटले. (Hasan Mushriff)