Friday, July 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खाकीला काळीमा! गुन्हे शाखेचा अधिकारी बनून कोटींची लुबाडणूक करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील PSI चा पर्दाफाश

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 23 July 2026, 15:37

पुणे: मुंबई गुन्हे शाखेने बनावट वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या मोहम्मद खतिब उर्फ डॉ. राज खतिब प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ येथे कार्यरत पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) संजय रामभाऊ जाधव याला अटक करण्यात आली असून, तपासात त्याचे नाव समोर आल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट-३ ने ही कारवाई केली.

या प्रकरणाची सुरुवात गुजरातमधील रिअल इस्टेट व्यावसायिक नितीन चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीनंतर झाली. पोलिसांच्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२० मध्ये मोहम्मद खतिब, संजय जाधव आणि महसब घौस खतिब यांनी चौधरी यांना त्यांच्या मित्राला एक कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. या कामासाठी त्यांनी १० लाख रुपये कमिशन म्हणून स्वीकारल्याचा आरोप आहे. मात्र, आश्वासनानुसार कोणतेही काम झाले नाही आणि घेतलेली रक्कमही परत करण्यात आली नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तपासादरम्यान मिळालेल्या तांत्रिक पुराव्यांमधून संजय जाधव हा मोहम्मद खतिबच्या सतत संपर्कात असल्याचे समोर आले. तसेच मुंबई विमानतळाजवळील एका हॉटेलमध्ये तो खतिबसोबत उपस्थित असल्याची माहितीही तपासात पुढे आली. त्यावेळी त्याने स्वतःची ओळख गुन्हे शाखेतील अधिकारी म्हणून करून दिल्याचा आरोप आहे. याशिवाय जाधवविरुद्ध यापूर्वीही वाशी पोलीस ठाण्यात २०२२ मध्ये आणि सानपाडा पोलीस ठाण्यात २०२४ मध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची बाबही तपासात उघड झाली आहे.

 

दरम्यान, मोहम्मद खतिबविरोधातील आरोपांची व्याप्ती वाढत असून त्याच्याविरुद्ध आणखी गंभीर तक्रारी समोर येत आहेत. दक्षिण मुंबईतील एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, खतिबने तिच्या कुटुंबाची फसवणूक केली, इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकला आणि लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला, असे आरोप करण्यात आले आहेत. तसेच फार्मास्युटिकल वितरण व्यवसाय मिळवून देण्याचे आमिष दाखवून पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचाही दावा करण्यात आला आहे.

या प्रकरणात धमेंद्र कुमार नावाच्या व्यक्तीलाही अटक करण्यात आली असून, तो तब्बल २८ वर्षे डॉक्टर म्हणून वावरत असल्याचा आरोप आहे. गुन्हे शाखेकडून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, या रॅकेटमधील इतर व्यक्तींचा सहभाग आणि आणखी संभाव्य फसवणुकीच्या घटनांचा शोध घेतला जात आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मुसळधार पावसात एकटी तरुणी पोलिसांच्या व्हॅनसमोर उभी ठाकली; पाहा थरारक व्हायरल Video

Thursday, 23 July 2026, 22:58

“जनता मालक अन् शिक्षणमंत्री सेवक… राजीनामा द्यायलाच हवा!” अण्णा हजारेंच्या भूमिकेने वाढवली सरकारची धडधड

Thursday, 23 July 2026, 22:06

पुण्यात मुसळधार पावसामुळे मोठे रस्ते खचले! राजगड तालुक्यातील वाहतूक तडकाफडकी बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश

Thursday, 23 July 2026, 21:11

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज महागात पडणार! एक जिल्हा, एक दिवस, एक मागणी; CJP ची उद्या संपूर्ण देशात ‘देशव्यापी आंदोलना’ची हाक

Thursday, 23 July 2026, 20:28

हवामान खात्याची मोठी चेतावणी! पुण्यात पावसाचा हाहाकार माजणार? जाणून घ्या हवामान तज्ज्ञांचा मोठा गौप्यस्फोट

Thursday, 23 July 2026, 19:27

सणसवाडीतील कंपनीतून ८०० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; दोन सराईत चोरटे जेरबंद

Thursday, 23 July 2026, 19:21
Next Post

राज ठाकरेंचा '3 शब्दांचा' राजकीय बॉम्ब; मोदी-पवार भेटीवर मिश्किल टोलेबाजी, म्हणाले....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.