पुणे : राजधानी दिल्लीत सध्या ‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला होता.मात्र, या भेटीनंतर शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीवर राज ठाकरेंनी मिश्किल टोलेबाजी केली आहे.

मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीबाबत राज ठाकरेंनी आपल्या सहज आणि मिश्कील शैलीत अवघ्या तीन शब्दांत उत्तर दिले— “त्यालाच जंतर-मंतर म्हणतात!”त्यांच्या या अवघ्या तीन शब्दांच्या प्रतिक्रियेने पत्रकार परिषदेत खळबळ उडाली.सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील या राजकीय हालचालींवर राज ठाकरेंनी मारलेला हा टोला सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये 26 जुलैचा मोर्चा, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी यावर दोन्ही नेत्यांनी भाष्य केले. सरकारवर निशाणा साधताना राज ठाकरे म्हणाले, “विरोधी पक्ष विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करत असल्याचे आरोप सत्ताधारी करत आहेत. पण पूर्वी काँग्रेसच्या काळातही आंदोलने झाली आणि म्हणूनच लोकांनी भाजपला सत्ता दिली, मात्र हेसुद्धा तसेच वागत आहेत.”
जंतर-मंतरवर गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष, नेते आणि कलाकारांचा पाठिंबा मिळत आहे.






