पुणे : पुणे शहराचे, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-०३, सुहेल शर्मा यांची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग येथे बदली झाल्याने पोलीस आयुक्त कार्यालयात निरोप समारंभ शनिवारी 30 तारखेला आयोजित करण्यात आला होता.
सुहेल शर्मा हे आय.पी.एस. म्हणून २०१२ रोजी रूजु झाले होते. त्यांनी चंद्रपूर जिल्हयातून आपल्या पोलीस कारकिर्दीला सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांनी बुलढाणा, कोल्हापूर, सांगली, मुंबई आणि पुणे शहर येथे उत्कृष्टरित्या कर्तव्य बजावले आहे. २०१६ मध्ये जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट यशस्वीरित्या चढाई केली होती. त्यामुळे ते माऊंट एव्हरेस्ट यशस्वीवर चढाई करणारे पहिले (आय.पी.एस.) अधिकारी देखील बनले आहेत.
यावेळी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते सुहेल शर्मा यांचा सत्कार करण्यात आला. निरोप समारंभास अपर पोलीस आयुक्त, प्रशासन, अरविंद चावरिया, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) व पोलिरा राह आयुक्त अतिरिक्त कार्यभार, रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, प्रविणकुमार पाटील, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे), अमोल झेंडे, पोलीस उप-आयुक्त, परि-०२, पुणे, स्मार्तना पाटील, पोलीस उप-आयुक्त, वाहतुक, पुणे, विजय मगर, पोलीस उप-आयुक्त, मुख्यालय, रोहीदास पवार, नवनियुक्त मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ – ३ श्री. संभाजी कदम तसेच इतर अधिकारी / अमंलदार उपस्थित होते.
पुणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये १५ नोव्हेंबर २०२२मध्ये रोजी त्यांनी पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-०३, म्हणून कार्यभार स्वीकारला होता. पोलीस उप-आयुक्त म्हणुन कर्तव्य बजावत असताना, त्यांनी परिमंडळ-०३ मधील संवेदनशील व महत्वाचे गुन्हयाचा तपास उत्कृष्ठपणे करुन, सदर गुन्हे उघडकीस आणले. त्यांच्या अधिपत्याखालील योग्य मार्गदर्शन केले. त्यांना दि.२५ डिसेंबर २०२३ रोजी पोलीस आयुक्तालयाचे आस्थापनेवरून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग याठिकाणी झालेल्या बदलीवर मोकळीक करण्यात आलेली आहे.