पुणे : येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने रविवारी मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत दोघांना उडवले होते. या घटनेत अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या तरुणांचा मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. दरम्यान, आरोपी विरोधात जयंत पाटील यांचा भाचा आणि शरद पवार गटाचे आमदार माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली. यामध्ये त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही, पण अप्रत्यक्षरित्या त्यांचा रोख पुणे अपघातातील अल्पवयीन मुलाकडे असल्याचे पोस्टवरून स्पष्ट होत आहे.
कल्याणीनगर येथील कार ॲक्सीडेंट नंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या…
संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती.
— Sonali Tanpure (@TanpureSonali) May 21, 2024
यावेळी शरद पवार गटाचे आमदार माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, कल्याणीनगर येथील कार अपघातानंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या आहे. संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती. मात्र, योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही.
या मुलांच्या त्रासाला कंटाळून माझ्या मुलाची शाळा बदलावी लागली. या घटनेचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावर असून वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच शाळेने किंवा पालकांनी घेतली असती तर आज असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता. त्यादिवशी झालेल्या अपघातात सुशिक्षित तरुण तरुणीचा निष्पाप बळी गेला नसता. या कारणाने त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. त्यांच्या कुटुंबांना न्याय मिळायला हवा, यावेळी त्यांनी पोस्टद्वारे बोलल्या