पुणे : पुणे एटीएसच्या तपासात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पुणे एटीएसने तीन दहशतवाद्यांना पुणे सत्र न्यायालयात हजर केले. हे तिन्ही दहशतवादी एनआयएच्या कोठडीत होते. या दहशतवाद्यांनी सोने आणि साडीचे दुकान लुटल्याचे आणि त्यातून बॉम्ब खरेदी केल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. तीनपैकी दोन दहशतवाद्यांनी साताऱ्यातील साडीचे दुकान लुटले. दुकानदाराला बंदुकीचा धाक दाखवून एक लाख रुपये लुटण्यात आले.
पुणे एटीएसच्या पथकाने मोहम्मद शाहनवाज आलम शफिउज्जमान खान ऊर्फ अब्दुल्ला उर्फ इब्राहिम (वय ३१), मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी उर्फ छोटू आणि झुल्फिकार अली बडोदावाला ऊर्फ लाला ऊर्फ लालाभाई (वय ४४) यांना न्यायालयात हजर केले होते. सातारा दरोडा प्रकरणी २८ वर्षीय दुकानदाराने सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
अजिंठा चौकातील गणपती सिल्क साडी सेंटरमध्ये ८ एप्रिल रोजी बंदुकीचा धाक दाखवून दोन अनोळखी व्यक्तींना अटक करण्यात आली होती. हे तिघेही इसिस संघटनेचे सदस्य असून दहशतवादी घटना घडविण्यासाठी तिघांनी मिळून सातारा दरोड्याचा कट रचला होता नंतर त्याने पैशांचा वापर करून बॉम्ब बनवण्याचे साहित्य विकत घेतले. न्यायालयाने तिन्ही दहशतवाद्यांना २१ मार्चपर्यंत पुणे एटीएस कोठडी सुनावली आहे.
या तिघांनी पुण्यातील आजूबाजूच्या परिसरात बॉम्बस्फोटाचा सराव केला होता. दहशतवादी जंगलात तंबू ठोकून काही दिवस राहिले देखील होते. पुण्याजवळच्या पानशेत जवळच्या दाट झाडींमध्ये, त्याचबरोबर सातारा शहराच्या जवळ असलेल्या झाडींमध्ये तर कोल्हापूर जिल्ह्यातील आंबोलीच्या जंगलात या दहशतवाद्यांनी हा सराव केल्याचं समोर आलं होतं