Pune पुणे : सोलापूर जिल्ह्यातील माढा – कुर्डूवाडी येथे कार्यरत असलेल्या उपविभागीय अधिकारी ज्योती भूषण (कदम) यांची पुणे येथे निवासी उप जिल्हाधिकारी या पदावर बदली करण्यात आली आहे. हे आदेश शासनाचे सहसचिव डॉ. माधव वीर यांनी दिले आहेत.
३५ उपजिल्हाधिकारी पदावरील अधिकारी आणि तहसीलदारांच्या बदल्या…!
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागातील ३५ उपजिल्हाधिकारी पदावरील अधिकारी आणि तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या. यावेळी हवेलीच्या तत्कालीन उपविभागीय अधिकारी ज्योती कदम यांची माढा – कुर्डूवाडी येथे बदली करण्यात आली होती.
सातबारा संगणकीकरण व प्रलंबित केसेस काढण्यावर कदम यांनी भर दिला होता. कदम यांनी यापूर्वी नायब तहसीलदार, तहसीलदार, जिल्हा पुरवठा अधिकारी, उपविभागीय अधिकारी म्हणून पुणे जिल्ह्यात काम केले आहे. तसेच त्यांची आता निवासी उप जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे.
दरम्यान, जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणाऱ्या प्रांताधिकारी अशी त्यांची ओळख सोलापूर जिल्ह्यात झाली होती. त्यामुळे कदम यांनी माढा – कुर्डूवाडी येथे उपविभागीय अधिकारी म्हणून चांगले काम केल्याप्रकरणी राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.