पुणे : उद्घाटनानंतर कार्यान्वित होण्याच्या प्रतीक्षेत असलेले पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल पुणेकरांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. या नव्या टर्मिनलच्या व्यवस्थेचा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यवस्थेचा आणि सज्जतेचा आढावा घेतला.
उद्या (रविवार, दि. १४ रोजी) हे नवे टर्मिनल कार्यान्वित होत असून हे टर्मिनल म्हणजे पुण्याच्या विकासाचे साक्षीदार आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पाहणीनंतर व्यक्त केली. पुणे विमानतळावरील नवे टर्मिनल सुरू करण्यासाठी केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी सीआयएसएफच्या जवानांच्या संख्येचा प्रश्न केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन सोडवला होता. तसेच इतर तांत्रिक प्रक्रियाही पूर्ण करून घेतल्या आणि नवे टर्मिनल कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा केला.