लोणी काळभोर : कोणताही शासकीय परवाना नसताना लोणी स्टेशन परिसरात कृषी कीटकनाशकांची विक्री होत असल्याचा पर्दापाश करण्यास पुणे कृषी विभागाला बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास यश आले आहे. या कारवाईत बोगस मुद्देमाल जप्त करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, या कारवाईत अनेक शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या कारवाईत 30 ते 35 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे.
सविस्तर बातमी थोड्या वेळातच