Tuesday, October 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Accident: मदत जीवावर बेतली! कॉलेज तरुणींना लिफ्ट दिली अन् भीषण अपघातात दोघेजण जागीच ठार

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 15 October 2025, 16:17
Pune Accident: Help cost lives! College girls were given a lift and two died on the spot in a horrific accident

Photo-Social Media

पुणे: खेड-शिवापूरकडून पुण्याला येताना (Pune Accident) कात्रज घाटात झालेल्या भीषण (Pune News) अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाली आहे. सकाळी साडेआठच्या सुमारास घडलेल्या या अपघातात पीएमपी बसने दुचाकीला धडक दिली. पोलिसांनी बसचालकावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

अपघात भिलारेवाडी येथील वळणाजवळ झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमपीची सारोळा ते बालाजीनगर बस खेड-शिवापूरकडून कात्रजकडे येत होती. समोरून येणाऱ्या डंपरने अचानक ब्रेक लावल्याने दुचाकीस्वारानेही आपला वेग घटवला, पण मागून येणाऱ्या बसचालकाला आपला वेग नियंत्रित करता आला नाही आणि त्याने दुचाकीला जोरदार धडक दिली.

या धडकेत दुचाकीस्वार आकाश रामदास गोगावले (वय 29, रा. ससेवाडी, ता. भोर) आणि अनुष्का प्रकाश वाडकर (वय 27) यांचा जागीच मृत्यू झाला. नेहा कैलास गोगावले (वय 20, रा. ससेवाडी) ही तरुणी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातामुळे कात्रज घाटात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. आंबेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शरद झिने यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पुन्हा सुरळीत केली. पीएमपी बसचालक सुधीर दिलीप कोंडे (वय 42, रा. आर्वी) याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी केली आहे.

 

मृत आकाश गोगावले यांनी नुकतेच महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले होते. दोन महिन्यांपूर्वीच ते पुण्यात बिबवेवाडी परिसरातील एका कंपनीत नोकरीला लागले होते. त्यामुळे तो दररोज दुचाकीने पुण्यात कामासाठी येत असे. अपघाताच्या दिवशी बस थांब्यावर गावातील दोन तरुणी कॉलेजला जाण्यासाठी उभ्या होत्या. त्यांना मदत करण्यासाठी आकाशने त्यांना दुचाकीवर ‘लिफ्ट’ दिली होती. दुर्दैवाने, ही मदत जीवावर बेतली आणि तिघे जण दुचाकीवर प्रवास करत असताना अपघाताचा बळी ठरले.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

उद्योजक राणा सूर्यवंशींवरील जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी तिघे जेरबंद; कर्वेनगरमधून दोघे, तर भिगवण परिसरातून तिसरा आरोपी ताब्यात

Tuesday, 20 October 2026, 19:50

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या पशुपालकांसाठी राज्य सरकारचा दिलासादायक निर्णय; चारा बियाणे योजनेच्या अटी शिथिल

Tuesday, 20 October 2026, 19:44

लाडक्या बहिणींनो या दिवाळीत दुप्पट रक्कम खात्यात जमा होणार? थेट ३ हजार रुपये मिळणार? जाणून घ्या सविस्तर

Tuesday, 20 October 2026, 19:24

दूध अन् तेलानंतर आता मुंढेंचा मोर्चा मसाल्यांकडे! मसाल्यांच्या उत्पादन, वाहतूक आणि विक्रीसंदर्भात कडक आदेश जारी

Tuesday, 20 October 2026, 19:15

पुणेकरांसाठी मोठी बातमी! म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यास तिसऱ्यांदा मुदतवाढ; आता ३० ऑक्टोबरपर्यंत संधी

Tuesday, 20 October 2026, 18:46

टायगर श्रॉफ लक्ष्य नव्हताच! हल्लेखोरांच्या निशाण्यावर होता मोठा व्यक्ती; आरोपीच्या स्टेटमेंटने तपासाला वेगळं वळण..

Tuesday, 20 October 2026, 17:48
Next Post
Jayant Patil and Raj Thackeray attack Election Commission over errors in voter list; 869 voters registered at one address in 'Ya' area of ​​Pune

 मतदार यादीतील त्रुटींवरून जयंत पाटील अन् राज ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; पुण्यातील 'या' भागात एकाच पत्त्यावर 869 मतदारांची नोंद, धक्कादायक आकडेवारी समोर...      

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp