(Pune पुणे) : यात्रेसाठी गावी चाललेल्या अग्निशमन दलाच्या जवानाने गाडी थांबविली. आणि देवदूत बनून BMW कारला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केल्याची घटना उंड्री पिसोळी (ता. हवेली) येथील धर्मावत पेट्रोल पंपासमोर मंगळवारी (ता.११) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अग्निशामक दलाच्या जवानाने कर्तव्यावर नसतानादेखील प्रसंगवधान दाखवून आग विझविण्याचा प्रयत्न केल्यामुळे या जवानाचे नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.
हर्षद येवले असे कौतुक होत असलेल्या जवानाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार…!
हर्षद येवले हे कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्रात काम करतात. येवले हे आपल्या कुटुंबासमवेत यात्रेकरिता चारचाकी वाहनातून चालले होते. तेव्हा त्यांना एका BMW कारने पेट घेतल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने गाडी थांबविली आहे. आगीच्या दिशेने धाव घेत गाडीत कोणी अडकले आहे का याची प्रथम पाहणी केली. नंतर धर्मावत पेट्रोल पंप येथील अग्निरोधक उपकरण वापरुन बीएमडब्ल्यु-एक्सवन या पेटलेल्या वाहनाची प्राथमिक स्वरुपात आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, या घटनेची अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात माहिती मिळताच, कोंढवा बुद्रुक अग्निशमन वाहन व वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा करत आग पूर्ण विझवली. अग्निशमन दलाचे कार्य पार पडताच उपस्थित नागरिकांनी व कुटुंबिय यांनी जवान हर्षद येवले व इतर जवानांचे ही कौतुक केले.
ही आग विझविण्यासाठी कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्र येथील वाहनचालक बाबुराव जाधव, अक्षय खरात व तांडेल सोपान कांबळे आणि जवान अभिजित थळकर, अर्जुन यादव, साहिल पडये, अनिल चव्हाण यांनी प्रयत्न केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune | जिल्ह्यात वर्षभरात रेशीम कोषाचे २ लाख किलोपेक्षा अधिक उत्पादन!
Pune : मुलीचा पहिला स्मृतीदिन ! वडिलांनी जनता वसाहतीतील मुलींना खाऊ घातले हापूस आंबे!
Pune News | आईच्या आठवणी जपण्यासाठी पोरांनी उभारलं स्मारक ; पुण्यातील गोळे कुटुंबियांचा आदर्श..!