सागर जगदाळे
भिगवण : कोरोना काळांमध्ये शिक्षण पध्दतीमध्ये झालेल्या अमुलाग्र बदलाचा वेध घेणाऱे, महाराष्ट्रातील विविध विदयापीठ कार्यक्षेत्रातील प्राध्यापकांनी एकत्र येऊन लेखन व संपादन केलेल्या ‘इमर्जिंग ट्रेऩ्डस् इन टिचींग ऑफ इंग्लिश लॅग्वेज’ या पुस्तकाचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस व मान्यवरांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
कोरोना काळांमध्ये शिक्षणाच्या विशेषतः भाषा आणि इंग्रजी भाषा शिक्षण पध्दतीमध्ये झालेल्या बदलांचा वेध घेणाऱे ‘इमर्जिंग ट्रेऩ्डस् इन टिचिंग ऑफ इंग्लिश लॅंग्वेज'(Emerging Trends in Teaching of English Language) या पुस्तकाचे लेखन व संपादन येथील कला महाविदयालयातील प्रा. डॉ. प्रशांत चवरे, मिरजगांव येथील महात्मा फुले महाविदयालयातील प्राध्यापक डॉ. भुषण तागड, टेंभुर्णी(जि. सोलापुर) येथील विठ्ठलराव शिंदे कला महाविदयालयातील प्राध्यापक डॉ. नेताजी कोकाटे, सोलापुर येथील संगमेश्वर महाविदयालयातील प्राध्यापिका डॉ. मनिषा चवरे-जाधव, सातारा येथील शिवाजी महाविदयालयातील प्रा. तानाजी देवकुळे यांनी केले.
या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांचे हस्ते व भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार, प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज, सरपंच दिपीका क्षीरसागर, भिगवण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजित क्षीरसागर, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. अमोल खानावरे, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष रियाज शेख, मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पिसाळ, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. तुषार क्षीरसागर, सोशन मिडिया सेलचे अध्यक्ष सागर जगदाळे उपस्थित करण्यात आले.
पुस्तक प्रकाशनावेळी बोलताना डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील व वेगवेगळ्या विदयापीठातील प्राध्यापकांनी एकत्र येऊन लेखन व संपादन केलेले इमर्जिंग ट्रेंडस् इन टिचिंग ऑफ इंग्लिश लॅग्वेज हे पुस्तक अभ्यासक व विदयार्थ्यांना निश्चित उपयुक्त ठरेल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संयोजन प्रा. डॉ. प्रशांत चवरे यांनी केले.