राजेंद्रकुमार शेळके
पुणे – मोहरली काव्यबत्तीशी या प्रातिनिधीक काव्यसंग्रहाचे प्रकाशन जेष्ठ कवयित्री जयश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.कातोली (कोल्हापूर) येथील प्रसिद्ध कवयित्री अश्विनी श्रीहरी मेंगाणे निर्मित काव्यबत्तीशी काव्य प्रकारास तीन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख उपस्थिती संपादिका, काव्यबत्तीशी निर्मितीकार, मोहरली लेखणी समूह संस्थापिका अश्विनी श्रीहरी मेंगाणे, समूह सहसंचालिका दीपा तळकर, मंजुश्री चिप्पलकट्टी यांची विशेष उपस्थिती होते. या काव्यसंग्रहाचे आकर्षक मुखपृष्ठ सचिन भोसले यांनी केले आहे.
या वर्धापनानिमित्त सर्व दिग्गज साहित्यिकांचा मिळून मोहरली काव्यबत्तीशी हा प्रातिनिधिक काव्यसंग्रह पुस्तक स्वरूपात प्रकाशित करण्यात आला. पुस्तक प्रकाशनामध्ये संपादिका अश्विनी श्रीहरी मेंगाणे यांना त्यांचे पती श्रीहरी दौलतराव मेंगाणे यांची खूप मोलाची साथ लाभली. या तृतीय वर्धापन दिनाचे औचित्य साधून समूहातील अनेक नामवंत कवी कवियत्री यांनी स्वता रचलेल्या काव्यबत्तीशी कवितांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.
दरम्यान, अश्विनी मेंगाणे यांनी स्वतः निर्माण केलेला हा काव्य बत्तीशी काव्यप्रकार साहित्य क्षेत्रात एक नवा इतिहास घडवेल व त्याचा झेंडा सात समुद्रापार जाईल असा विश्वास सर्व मोहरलीकरांनी व्यक्त करत या तृतीय वर्धापन दिनास व प्रातिनिधिक काव्यसंग्रहास शुभेच्छा दिल्या.