सासवड : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ वाघिरे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सासवड आणि भारत सरकार तहसील विभाग सासवड (ता.पुरंदर) यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती व नवमतदार नोंदणी अभियान याचे आयोजन करण्यात आले.
या अभियानावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके, उपप्राचार्य वाणिज्य विभाग डॉ.सुभाष वाव्हळ यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सासवड तहसील विभागाचे नायब तहसीलदार संतोष सानप यांनी विद्यार्थ्यांना निवडणूक आयोग, मतदान प्रक्रिया, मतदानाचे महत्त्व, आपले अधिकार आणि कर्तव्य या संदर्भात अनमोल मार्गदर्शन केले.
यावेळी विज्ञान विभागाचे समन्वयक डॉ. बी यु माने, इतर विभाग प्रमुख प्राध्यापक व कर्मचारी वृंद उपस्थित होते. या नव मतदार नोंदणी अभियान कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्यशास्त्र विभागाचे प्रा.दिपक उजागरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन विज्ञान विभागाच्या डॉ.शितल कलापुरे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन राज्यशास्त्र विभागाच्या वतीने करण्यात आले होते.