युनूस तांबोळी
शिरूर : शिरुर तालुक्यातील बेट भागात बेल्हा-जेजुरी महामार्गावर सकल मराठा समाजाच्या वतीने मोर्चा काढून, दोन तास ‘रास्ता रोको’ करण्यात आला. यामध्ये जांबूत, पिंपरखेड, वडनेर, कावळ, पिंपरी, फाकटे गावातील ग्रामस्थांनी सहभाग घेतला.
या वेळी महामार्गावर सुमारे १ किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शिरुर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर व पोलीस उपनिरीक्षक सुनिल उगले यांनी बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडली.