पुणे : बदलापूरमधील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरलं होतं. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोपांच्या फैरी झाडल्या जात होत्या. आता या बदलापूर अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीकडून राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य महाविकास आघाडीतील आजी माजी आमदार, महापौर, कार्यकर्ते याच्या उपस्थितीत आज भर पावसात पुण्यामध्ये हे मूक आंदोलन करत आहेत. तोंडावर काळा मास्क लावून निषेध व्यक्त केला जात आहे.
पुणे स्टेशन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर हे आंदोलन सुरूया असून रमेश बागवे, मोहन जोशी, शिवसेनेचे बाबर, प्रशांत जगताप, रविंद्र धंगेकर, अरविंद शिंदे, संगिता तिवारी, वंदना चव्हाण, आबा बागुल यांच्यासह अन्य काही नेते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित आहेत.
बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ आंदोलन..
बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी व घटक पक्षांच्यावतीने आज बंद पुकारण्यात आला होता, परंतु तो रद्द करण्यात आला आहे. त्याऐवजी महाविकास आघाडीकडून मूक आंदोलन केले जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सह महाविकास आघाडीच्या अन्य नेत्याच्या उपस्थितीत आज मूक आंदोलन केले जात आहे. आज सकाळी 10 ते 11 या वेळेमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत हे मूक आंदोलन केले जात आहे.
बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी व घटक पक्ष आता मैदानात उतरले असल्याचे दिसून येत आहे. पुण्यात शरद पवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं ‘निषेध आंदोलन’ सुरु असून तोंडाला काळा मास्क लावून आणि हाताला काळी फित बांधून शरद पवार या आंदोलनात सहभागी झाले आहेत. पुणे स्टेशन परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बसून हे आंदोलन केलं जात आहे.