गणपत घोडेकर
(सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता, पाटबंधारे खाते)
Shirur News : शेती व्यवसायासाठी आठमाही पाणि मिळण्यासाठी मुख्य यंत्रणा ही पाटबंधारे खात्याकडे देण्यात आलेली आहे. राज्यात पावसाचे पाणी अडवून ते टप्प्याटप्याने नागरिकांना शेती बरोबर पिण्यासाठी वापरात यावे. हे महत्वाचे धोरण राबवण्याचे काम केले जाते. सध्या मात्र पावसाचे प्रमाण वाढले असल्याने या पाण्याचा वापर शेती व इतर व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. (Protect dams, canals, embankments Main tool during drought for agriculture :- Ganpat Ghodekar)
पाटबंधारे खाते व पाणीेवापर संस्थानी पुढाकार घ्यावा
गेली अनेक वर्षे ही यंत्रणा सुरू असली तरी जलाशय, धरणे यातील पाणि नवसंजीवनी ठरत असल्याने धरण, कालवे, बंधारे यांचे रक्षण करणे महत्वाचे आहे. त्यासाठी पाटबंधारे खाते व पाणीेवापर संस्थानी पुढाकार घेऊन जास्तीत जास्त काळ ही यंत्रणा कार्यरत राहिल याची काळजी घेतली पाहिजे.
राज्यात पाटबंधारे खाते अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी जलाशय, बंधारे बांधण्यात आलेले आहेत. दुष्काळी भागांना पाणि मिळावे. दुष्काळात शेती बरोबर किमान माणसे व जनावरे यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी. हा उद्देश ठेवून ही बंधारे बांधण्यात आलेली आहेत. (Shirur News 🙂 महाराष्ट्र राज्यात अनेक वेळा दुष्काळाला सामोरे जावे लागले. त्या काळात नागरिकांनी नदीमध्ये झरा करून पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून घेतली आहे. त्यामुळेच नदी काठी असणाऱ्या गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे. हा हेतू ठेवून नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला. त्यातून बंधाऱ्यामधून पाणि साठा होऊ लागल्याने या पाण्यावर शेती व्यवसाय व शेती पुरक व्यवसाय देखील होऊ लागले.
पावसाळ्यानंतर येणारा हिवाळा व उन्हाळा याकाळात शेतीमध्ये वेगवेगळी पिके, फळभाज्या घेऊन शेतकरी शेती करू लागला. ऊसा सारखे पिक देखील या पाण्यावर घेतल्याने साखर कारखान्याचा उतारा व उत्पन्न वाढल्याचे दिसून येते. राज्यात मोठ्या ऊसाची शेती व साखर कारखानदारी वाढल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.या पाण्यामुळेच शेतकऱ्याचे जीवनमान देखील उंचावले.
पाटबंधारे खात्याने दोन आवर्तनाच्या माध्यमातून शेती पाठोपाठ पिण्यासाठी पाणी मिळावे. यासाठी नदी काठ नसणाऱ्या परिसराला कालव्याच्या माध्यमातून पाणि देण्याचे धोरण आखले. (Shirur News 🙂 यामध्ये पहिल्यांदा कालवा तयार करून घेण्यात आला. या कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होते यासाठी अस्तरीकरण करून घेण्यात आले. त्यातून टेल टू हेड असे आवर्तन देऊन पाण्याचे व्यवस्थापन करण्यात आले. सध्या जेथे कालवे आहेत. शिवाय धरणाच्या लाभ क्षेत्रापर्यंत हे पाणि पोहचविण्याचे काम केले जाते.
त्यामुळे खरीप, रब्बी पिकांना देखील याचा फायदा होऊ लागला आहे. उन्हाळ्यात धरणाच्या मृत साठ्यापर्यंत पाणी देण्याचे काम पाटबंधारे खाते देते. सध्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशा प्रमाणे पाणी राखून ठेवून त्याचा जास्तीत जास्त नागरिकांच्या पिण्यासाठी व जनावंराच्या पिण्यासाठी केला जात आहे.
डोंगारात घाटमाथ्यावर पावसाचे पडणारे पाणी वाया जाते. हे पाणी अडवून साठवण करून ते माणसाच्या उपयोगी कसे येईल हे धोरण राबवून देशाचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी दुरदृष्टी ठेवून त्यांच्या काळात राज्यात मोठ मोठी धरणे तयार करून घेतली आहेत. या धरणाची क्षमता ठरवून त्या पाण्याचे लाभक्षेत्र ठरविले आहे.
दुष्काळी गावात पिण्याचे पाणी मिळण्याचे एकमेव साधन धरणे झाली आहेत. त्यामुळे शेतीला देखील या पाण्याचा वापर वाढला आहे. काही ठिकाणी कालव्यांचे अस्तरिकरण, धरण व बंधाऱ्यांची डागडूजी करणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने विशेष लक्ष देऊ कामे हाती घेतली पाहिजे. (Shirur News 🙂 लाभ क्षेत्रातील नागरिकांनी पाणी पट्टी भरून पाटबंधारे खात्याला सहकार्य केले पाहिजे. यासाठी पाणी वापर संस्थांनी लक्ष दिले पाहिजे.
धरणातले पाणी नवसंजीवनी ठरत असल्याने आपले हक्काचे पाणी आरक्षीत करून त्याचे संरक्षण करणे गरजेचे आहे.
शब्दांकन : युनूस तांबोळी
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Suicide | शिरुरमध्ये महिलेची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अस्पष्ट…
Shirur News : लहान भावावर कुऱ्हाडीने वार करणाऱ्या बाप लेकाला ७ वर्षाची सक्तमजुरी