पुणे : पुणे येथील जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग आणि मॅनेजमेंटमधील आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि एआयएमएल विभागाच्या प्रमुख प्रा. रचना साबळे यांना शिक्षण मंत्रालय आणि एआयसीटीईच्या सहकार्याने ब्रेनव्हिजनद्वारे ज्येष्ठ आचार्य भारत शिक्षण उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बीईईए (BEEA) पुरस्कार 2024 समारंभात प्रा. रचना साबळे यांना एआयसीटीईचे मुख्य समन्वय अधिकारी डॉ. बुद्ध चंद्रशेखर आणि आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रेड्डी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा विशाखापट्टणम येथील आंध्र विद्यापीठात झाला.
डॉ. आर. डी. खराडकर म्हणाले की, शिक्षणाद्वारे भविष्य घडवणाऱ्यांना आणि शैक्षणिक क्षेत्रात नाविन्य आणि उत्कृष्टतेचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्याला बीईईए अवॉर्ड्सने सन्मानीत करण्यात येते. प्रा. रचना साबळे यांची कामगिरी उत्कृष्टतेची बांधिलकी आणि शैक्षणिक समुदायासाठी प्रेरणा दर्शवते. रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे अध्यक्ष सुनील रायसोनी आणि रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे कार्याकारी संचालक श्रेयश रायसोनी, कॅम्पस डायरेक्टर डॉ. आर. डी. खराडकर यांनी प्रा. रचना साबळे यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले.