राजेंद्रकुमार शेळके
पुणे : आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील भूगोल विषयाचे अध्यापक प्रा. रमेश गोपाळे यांना विज्ञान व तंत्रज्ञान शाखेअंतर्गत भूगोल विषयातील ‘अ स्टडी ऑफ पब्लिक हेल्थकेअर सिस्टिम इन पुणे डिस्ट्रिक्ट, महाराष्ट्रा-अ जॉग्राफिकल अप्रोच’ या संशोधन प्रबंधासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे (विद्यावाचस्पती) पीएचडी ही शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी प्रदान करण्यात आली.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य व विज्ञान-तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, उपप्राचार्य बी. जी. लोबो, एच. बी. सोनावणे व संशोधन केंद्राचे समन्वयक डॉ. सुचित्रा परदेशी यांनी त्यांचे अभिनंदन केले. श्री शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास पाटील यांचे त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.