भिगवण : पळसदेव येथील पळसनाथ विद्यालयात राष्ट्रीय व राज्यस्तरीय गुणवंत खेळाडुंचा शनिवारी (दि.२७) सन्मान करण्यात आला. ७५ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून खेळाडूंना सन्मानित करण्यात आले.
पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूषण काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण आले. प्रभातफेरी, ध्वजारोहण, स्काऊटगाईड संचलन, सांस्कृतिक कार्यक्रमातील विविध गुणदर्शनाचे बक्षीस वितरण घेण्यात आले.
विद्यालयातील राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती मल्ल अहिल्या शिंदे, राष्ट्रीय शालेय सायकलिंग नॅशनल स्पर्धेतील विजेता खेळाडू हरीश डोंबाळे, धर्नुविद्या-आर्चरी तिरंदाजी राज्यस्तरीय स्पर्धेतील खेलो इंडिया खेलोतील यशस्वी खेळाडु अविष्कार शिंदे, राष्ट्रीय ज्युदो कराटे स्पर्धा व खेलो इंडिया यशस्वी खेळाडू ओम हिंगमिरे, राज्यस्तरीय शालेय धावण्याच्या (रनिंग) स्पर्धेतील यशस्वी खेळाडु बालाजी अडवाल आदी खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य बिभीषण शेरखाने यांचा सेवापूर्ती गौरव सन्मान कार्यक्रम संपन्न झाला. विद्यार्थी वक्त्यांची भाषणे, अध्यक्षीय मनोगत, खाऊ वाटप, सस्नेह भोजन आदी कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले.
यावेळी पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूषण काळे, सचिव योगिराज काळे, संचालक बबन काळे, बाळासाहेब नायकवाडी, पळसदेवचे सरपंच अजिनाथ पवार, उपसरपंच कैलास भोसले, ग्रामविकास अधिकारी तुकाराम शिंदे, ग्रामपंचायत सदस्य मेघराज कुचेकर, महेंद्र काळे, अंकुश जाधव, विकास शिंदे, माजी सैनिक, विद्यालयाचे प्राचार्य बाळु काळे, पर्यवेक्षक विकास पाठक, अशोक जाधव, तानाजी इरकल, सहकारी सेवा संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ पालक आदीसह शिक्षक-शिक्षकेतर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पवार यांनी केले. तर आभार अविनाश शेलार यांनी मानले.