दौंड: दौंड तालुक्यातील नानविज ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी नुकतीच निवडणूक पार पडली. यामध्ये मावळते उपसरपंच सुनील पासलकर यांनी आपला कार्यकाळ पूर्ण झाल्याने राजीनामा दिला होता. त्यामुळे उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. यामध्ये प्रियंका पासलकर यांचा एकमेव अर्ज आल्याने ग्रामसेवक संतोष निंबाळकर व सभेचे अध्यक्ष विद्यमान सरपंच शरद पाटोळे यांनी प्रियंका पासलकर यांची उपसरपंच पदी निवड झाल्याचे जाहीर केले.
ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पंढरीनाथ पासलकर संचालक भीमा साखर कारखाना पाटस, शरद पाटोळे विद्यमान सरपंच, सुनील पासलकर माजी उपसरपंच, उद्धव पाटोळे ग्रामपंचायत सदस्य, दीपक पाटोळे, विकास पासलकर, अजय पासलकर यांनी शर्थीचे प्रयत्न केले.
आगामी काळात सर्वांना सोबत घेऊन गावच्या विकास कामांना प्राधान्य देणार आहे. तसेच दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत नानविज ग्रामस्थांसाठी भरघोस निधी मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत.
-प्रियंका अजय पासलकर, उपसरपंच नानविज