लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलजचा बारावीचा निकाल ९०.६० टक्के लागला आहे. या परीक्षेत केतकी काळभोर हिने 89.83 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य सीताराम गवळी यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दहावी व बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. बोर्डाने आज मंगळवारी (ता. २१) दुपारी १ वाजता बारावी परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला. या परीक्षेत विद्यालयातील कला शाखेतील १५२, वाणिज्य शाखेतील ८०, विज्ञान शाखेतील ८२ व व्यवसाय अभ्यास क्रमातील ६९ असे एकूण ३८३ विद्यार्थी बसले होते. यातील ३४७ विद्यार्थी परीक्षेत पास झाले आहेत.
विद्यालयाच्या कला शाखेतून केतकी रामदास काळभोर हिने ८९.८३ गुण मिळवून प्रथम, श्रावणी बालाजी जाधव हिने ८६ टक्के गुण मिळवून द्वितीय तर अपूर्वा अनिल दरेकर हिने ८५.८३ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे. वाणिज्य शाखेतून लक्ष्मी रमेश कांबळे व अपूर्वा अर्जुन कांबळे या दोघींनी ८२ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
निकिता माणिक काळभोर हिने ८१.८३ टक्के तर गायत्री लक्ष्मीपुत्र बिराजदार हिने ७८.८३ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे. तर व्यवसाय अभ्यासक्रमात भूमिका बालाजी बिराजदार हिने ७४.८३ गुण मिळवून प्रथम तर राणी उमाकांत भालेराव हिने ७२.६६ गुण मिळवून द्वितीय तेजस गणेश आतकरे याने ७१.३३ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
दरम्यान, यशस्वी विद्यार्थ्यांचे लोणी काळभोरसह परिसरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे. तर उर्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी मार्गदर्शक शिक्षकांना पेढा भरवून आनंद साजरा केला. यावेळी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे प्राचार्य सिताराम गवळी, ज्युनिअर कॉलेज विभागप्रमुख प्रा.अर्जुन कचरे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.